आयुक्तकृपा भाजप शहराध्यक्ष तुपाशी मासिक भाड्यात ७० टक्के सुट; पुणे मनपा कर्मचाऱ्यांनाही अशीच सुट द्या; काँग्रेसचे निवेदन

0
12

पुणे:- प्रभाग क्रमांक २९ मधे भाजपचे माजी नगरसेवक, शहराध्यक्ष भाजप मा धीरज घाटे यांच्या ताब्यात असलेल्या पुणे मनपा च्या मालकीच्या अंदाजे ५०० प्रति चौरस फूट कार्यालयास आणि ३००० प्रति चौरस फूट व्यायामशाळेस आयुक्तांनी दिलेल्या मासिक भाड्यातील ७० टक्के सुट याच न्यायाप्रमाणे महानगरपालिकेने सेवकांच्या घरभाड्यात कपात करण्या संदर्भात  काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज पुणे महानगरपालिका आयुक्त श्री राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदन देण्यात आले. पुणे महानगर पालिकेच्या वतीने सानेगुरुजी नगर आंबील ओढा सदाशिव पेठ पुणे येथील बांधण्यात आलेली व्यायामशाळा आणि भाजप नगरसेवक यांच्या कार्यालयाची मालमत्ता विभागाने काढलेली किंमत ३ कोटीच्या दरम्यान आहे, पुणे मनपा क्रीडा विभागाने कै भानुदास गेजगे व्यायामशाळेचे तसेच स्थानिक भाजप नगरसेवकाच्या कार्यालयाचे भाडे पुणे मनपाच्या नियमानुसार ५२०००/- ₹ होत असताना फक्त मनपा कर्मचाऱ्यांच्या सेवकांच्या मुलांसाठी ही व्यायामशाळा आहे असे दाखवून पुणे मनपा आयुक्तांनी ते भाडे २०,००० केले आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

सदर निवेदनात पुणे महानगरपालिके च्या सेवेत काम करणारे चतुर्थ श्रेणीमधील स्वच्छता कर्मचारी, विविध विभागातील कर्मचारी यांच्यासाठी पुणे महानगर पालिकेच्या वतीने राहण्यासाठी टाऊन प्लानिंग नुसार सदाशिव पेठ येथे सानेगुरुजी नगर,आंबील ओढा कॉलनी बांधण्यात आली. पण तेथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून (HRA) एच आर ए च्या माध्यमातून १२ ते १५ हजार रुपये घरभाडे कापले जाते पण त्यामानाने त्यांना पुणे मनपा कडून अपुऱ्या सुख सुविधा दिल्या जातात. आजही कर्मचाऱ्यांच्या मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत, अस्वच्छतेने कॉलनी भरून गेली आहे, दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर पाणी पोहचत नाही, सार्वजनिक शौचालयाची अवस्था वाईट झाली असतानाही पुणे मनपा कर्मचारी तिथे राहत आहेत. या सेवकांना घरभाड्यात ७०% कपात करावी. तसेच आज गेली ५० वर्षाहून अधिक काळ इथे अनेक सेवकांची कुटुंब वास्तव्यास आहेत, २०११च्या आधीच्या वास्तव्याचा पुरावा दिल्यास झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांचे हक्काचे घर शासनाकडून दिले जाते तर मग ह्या सेवकांना त्यांची राहती घरे मालकी हक्काची करून द्यायची तजबीज व्हावी. त्यांना त्यांचे राहते घर मालकी हक्काचे करण्यास उपाययोजना करावी आणि त्यांचे जागेवरच पुनर्वसन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

युवक काँग्रेसचे सागर धाडवे यांनी पुणे महापालिका आयुक्तांनी ‘लाडका नगरसेवक’ योजना राबविण्यापेक्षा लाडके पुणे महापालिका स्वच्छता सेवक योजना राबवून त्यांना न्याय द्यावा, भारतीय संविधानातील कलम १४ नुसार कायद्यापुढे सर्व समान या महत्वपूर्ण सिद्धांतानुसार योग्य न्याय द्यावा, वेगवेगळा न्याय देऊन सामाजिक दरी निर्माण करू नये अशी मागणी केली. तर शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी भाडे कमी करण्याचा आयुक्तांचा नियम जो भाजप नगरसेवकाला लागू केला आहे तो त्याच टी पी स्किम मधल्या सानेगुरुजी नगर मधील सेवकांना लागू करावा आणि सर्वांना समान न्याय मिळावा, ३ कोटीची मालमत्ता खिरापत वाटल्यासारखी आयुक्तांनी वाटप केले आहे व्यायामशाळेच्या भाड्यातच नगरसेवकाचे कार्यालय बसविण्याचा प्रकार पुणे मनपा क्रीडा विभागाने आणि विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाने केला आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?