शिवसेना दाढीवाला बंगला नव्या कार्यालयात भूत? शिवसैनिक फिरकेना उद्घाटन होणार?; पालकमंत्री मात्र या निर्णयावर ती ठाम

0

भूत म्हटले की आपल्या मनात एकदम धास्ती बसते. भूत आपल्याला मारणार की काय, अशी भीती वाटते. कुठे भूत आहे असे म्हटले की सर्वांच्या नजरा त्या घराकडे वळतात असाच प्रकार जळगाव शहरातील शिवसेनेच्या कार्यालयात दिसून आला आहे. राजकीय पक्षाचे कार्यालय मध्यवर्ती भागात असावं या हेतूने जुना प्रसिद्ध असलेला दाढीवाला बंगला नूतनीकरण करून जळगाव येथे शिवसेनेचे नवीन कार्यालय करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन ४ जून २०२५ रोजी होणार आहे. या अत्याधुनिक कार्यालयात ‘भूत’ असल्याची चर्चा पसरल्याने पदाधकारी व कार्यकर्ते जाण्यास नकार देत आहेत.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

पंचमुखी हनुमान मंदिराजवळील जुना प्रसिध्द असलेल्या दाढीवाल बंगल्याचे नूतनीकरण केले आहे. याठिकाणी तळमजल्यावर शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय केले आहे. या नवीन कार्यालयात अत्याधुनिक फर्निचर करण्यात आले असून जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष यांची दालने तयार केली आहेत. मात्र या कार्यालयात अद्यापतरी पदाधिकारी व कार्यकर्ते जात नसल्याचे सांगण्यात आले आहे. या ठिकाणी ‘भूत’ अफवा असल्याची पसरली होती, पदाधिकारी व कार्यकर्त्यात सुप्त चर्चा सुरू होती. मात्र याबाबत कोणी उघडपणे बोलत नव्हते. परंतु कार्यालयाकडेही कोणी जात नव्हते. या अत्याधुनिक कार्यालयाचे चार जून रोजी अधिकृत उद्घाटनही करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

पक्षाचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीच आपल्या भाषणात कार्यालयातील भूताच्या अफवेचा उल्लेख केला. ते म्हणाले पक्षाने नवीन कार्यालय उघडले आहे. परंतु तु या या ठिकाणी भूत असल्याच्या अफवेमुळे कोणी जाण्यास तयार नाही. चार जून रोजी उद्घाटन झाल्यावर आपण स्वतः या कार्यालयात दररोज बसणार आहोत. ही केवळ अंधश्रध्दा आहे, त्याला कोणीही बळी पडू नये. आज विरोधकांना कोणतेही काम राहिलेले नाही. जनतेतून पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधक अशा प्रकारच्या अफवा पसरवित आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीच आता ठाम विश्वास व्यक्त केल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते उद्घाटनानंतर या कार्यालयात जाणार काय? याकडेच आता सर्वांचे लक्ष असणार आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा