सुवर्ण मंदिराच्या गेटवर अकाली दलाच्या प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न

0

अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला आहे. एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीला रोखलं व त्याला ताब्यात घेतलं. नारायण सिंह असं आरोपीचं नाव आहे. सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यासाठी ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसले होते. यावेळी अचानक एक व्यक्ती आला व त्याने सुखबीर सिंग बादल यांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्याला पकडलं. आरोपी खालसाशी संबंधित असल्याचा संशय आहे.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत