पाकिस्तानला मदत तुर्कीला भोवणार, तुर्कीए, अझर बैझानवर बहिष्कार; भारतीय ट्रॅव्हल इंडस्ट्रीची भूमिका

0
12

मुंबई : वसुदेव कुटुंबकम् या सुत्रावर चालणारा भारत देश हा सर्वच देशांशी चांगले संबंध ठेवून आहे. मात्र तरीही जेव्हा केव्हा भारत आणि पाकिस्तानचा विषय येतो तेव्हा काही भारताविरुद्ध कुरापती करायला तयार असतात. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. मात्र या कुरापतीखोर पाकिस्तानला या काळात चीन, तुर्कीये, अझर बैझान या देशांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आता भारतातल्या पर्यटकांनी या दोन्ही देशांवर बहिष्कार घातला आहे.

कायमच सहनशील, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा भारत देश. वसुदेव कुटुंबकम् हे भारताचं सूत्र आहे, त्यामुळे सर्वांप्रती आपली प्रेम आणि आपुलकीची भावना असते. मात्र असं असलं तरी मुद्दा जेव्हा भारत पाकिस्तानचा येतो तेव्हा अनेक देश भूमिका घ्यायला कचरतात. विशेषत: मुस्लीम देश. तुमच्यात पडायचं नाही, असा पवित्रा घेत काही देशांनी तटस्थ भूमिका घेतली. मात्र तुर्कीये आणि अझर बैझान या दोन देशांनी उघड उघड पाकिस्तानला पाठिंबा दिलाय. यानंतर भारतीयांमध्ये संतापाची लाट पसरलीय.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

सर्वांनी पर्यटनासाठी तुर्कीये आणि अझर बैझानमध्ये जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. आमच्याकडून पैसे कमवायचे आणि आमच्याविरोधात वापरायचे, असा करंटेपणा करणारे हे देश आता बॅन असतील, असा एकमुखी निर्णय ट्रॅव्हल  कंपन्यांनीही घेतलाय. पर्यटकांनीही आपली तिकिटं रद्द केली. भारतातल्या अनेक मोठ्या ट्रॅव्हल एजन्सींनी तुर्की आणि अजरबैजानचे सगळे टूर पॅकेजेस आणि बुकिंग या रद्द केल्या आहेत. दहशतवादाला समर्थन देणा-या देशांमध्ये जाण्यासाठी पर्यटकांना प्रोत्साहन देणार नाही, अशी भूमिका भारतीय ट्रॅव्हल इंडस्ट्रीनं घेतली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाक दहशतवाद्यांना पोसतोय, याचे पुरावेही जगाला दिले. अशा काळात जगातले इतर देश पाठिशी उपस्थित राहावेत इतकी माफक अपेक्षा असताना तुर्कीये आणि अझर बैझान या देशांनी पाकला साथ दिली.  खरं तर, तुर्कीयेची ही जुनी खोड आहे. या देशाला भारतानं कायम मदत केली आहे.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

संकटकाळी भारताची तुर्कीयेला मदत :

– 2023 च्या विनाशकारी भूकंपावेळी पंतप्रधान मोदींनी NDRF ची दोन पथकं आणि कुशल डॉक्टर्स पाठवले

– पण काश्मीरच्या मुद्द्यावरून तुर्कीये पाकच्या मागे उभा राहिला

– इतकंच काय, 1965 आणि 71 मध्येही तुर्कीयेकडून पाकिस्तानला लष्करी मदत

– इस्लाम राष्ट्र म्हणून तुर्कीयेचा पाठिंबा तसंच तुर्की आणि पाकिस्तानमध्ये संरक्षण संबंध

–  चीन आणि तुर्कीयेकडून पाकिस्तानला शस्त्र पुरवठा

पाकिस्तान आणि अझर बैझानचे पारंपरिक संबंध आहेत. त्यामुळे तो कायम पाकिस्तानच्या पाठिशी राहिला आहे. तुर्कियेला दरवर्षी सुमारे साडे तीन लाख ते ४ लाख भारतीय पर्यटक भेट देतात. 2024 पासून भारतीय पर्यटकांचा ओघ तिकडे वाढला होता मात्र आता दोन्ही देशांच्या भूमिकांमुळे भारतीयांनी त्यावर बंदी घातली आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे