कोथरूड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संलग्न श्री शिवसाई संस्था ( ट्रस्ट ), पुणे यांच्या वतीने 1 मे महाराष्ट्र/कामगार दिनानिमित्त सांस्कृतिक मेजवानीत लकी ड्रॉ, मराठी लावण्या, नेत्रचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आली आहे.
गुरुवारी 01/05/2025 रोजी , वेळ – सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शिवसेना शाखा पौड रोड, आयडियल कॉलनी, ओगले चौक, कोथरूड येथे मोफत नेत्रचिकित्सा शिबीर, मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आयोजित करण्यात आले आहे. तर शुक्रवारी 02/05/2025 रोजी दुपारी ठीक 12 वाजता.यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे फक्त महिलांसाठी सदाबहार मराठी लावण्यांचा कार्यक्रम आणि भव्य लकी ड्रॉ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मोफत कुपन आणि प्रविशिकेसाठी 7796674565 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजक जयदीप पडवळ (मा.सभासद,पुणे मनपा,वृक्ष प्राधिकरण समिती) केले आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक श्री. मारूती वर्वे, श्री. नवनाथ भगत, श्री. दिपक दिघे, श्री. प्रकाश दिघे, अक्षय वर्वे, श्री. सुनील वाघ, श्री.प्रकाश सातपुते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम नियोजन केले आहे.