सन 1992 साली स्थापन झालेल्या श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या 32 वर्षातील पारदर्शक कारभार, संस्थेची आर्थिक स्थिती, सधन परिवारातील सर्व संचालक मंडळ, कर्ज वितरणातील नियमितता, संचालक कर्मचारी वर्गाची सौहार्दपूर्ण वर्तणूक आदी बाबींवर संस्थेचे सभासद विशेष खुष असून रामेश्वर पॅनल प्रचंड बहुमताने निवडून येण्यास कोणतीही अडचण नसल्याचे संस्थापक बाळासाहेब हगवणे यांनी सांगितले. 27000 भाग भांडवलावरून 32 वर्षे पूर्वी स्थापन झालेली संस्थेची आजपर्यंत उलाढाल ६५ कोटी करण्यामध्ये विद्यमान पॅनल मधील सर्व संचालक उमेदवारांचा पहिल्या दिवसापासून संस्थेच्या जड-घडणीत मोलाचा वाटा आहे.






खडकवासला परिसरामध्ये सर्वसामान्य गरजूवंतांच्या मदतीला श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था कायमच धावत आली आहे. 32 वर्षापासून योग्य स्थानिक माणसाच्या हातात पतसंस्थेचा कारभार राहिल्याने भागभांडवलामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मुळात कोणताही व्यक्तिगत हेतू मनात न धरता गेली तीस वर्षे या संस्थेचा कारभार सुरू असल्याने कर्जदार व सभासद यांनाही या गोष्टीचा अभिमान कायमच वाटत होता. मुळात प्रतिष्ठित लोकांची या संस्थेच्या पदाधिकारी म्हणून वर्णी लागल्यापासून संचालकांच्या हितसंबंधातून श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेवरती स्थानिकांचा प्रचंड विश्वास आजही आहे. कोणाच्याही व्यक्तिगत स्वार्थ हेतुला खतपाणी न घालण्याची भूमिका घेतल्यानेच नाराज गटाने आज पतसंस्थेवर मतदान घेऊन संचालक मंडळ निवडण्याची वेळ आली असली तरी सुद्धा निर्मळ निस्वार्थ हेतू असणाऱ्या श्री रामेश्वर पॅनललाच मतदार कायम पसंती देतील अशी ग्वाही संस्थापक बाळासाहेब हगवणे यांनी यावेळी दिली.
श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था आजची स्थिती एकूण- व्यवसाय ५७ कोटी
- ठेवी ३३ कोटी (पुणे जिल्हा कार्यक्षेत्र)
- दरवर्षी लाभांश वाटप
- कर्ज वाटप २४ कोटी
- सभासदांच्या सुरक्षित ठेवी २० कोटी
- ठे्वींवर आकर्षक व्याजदर
- ९0% पर्यत कर्ज तारण व्यवस्था
- फिरते भांडवल ५३ कोटी
- सुवनिधी १२ कोटी
- एनपीए ५%
संस्थेच्या पुढील वाटचालीमध्ये सभासदांना आर्थिक साक्षर करण्यासाठी प्रशिक्षण व्यवस्था उभी करणे, पतसंस्थेची उलाढाल आगामी काळात २०० कोटी पर्यत करणे आणि एनपीए दर ०% करण्याचे ध्येय असून नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजक तरूणांना व्यवसाय उभारणी व विकासासाठी सुलभ कर्ज योजना राबविणे, नवीन आकर्षक व्याजदराच्या थेट योजना कार्यान्वित करणे, सभासदांना व्यक्तिगत विमा संरक्षण लाभ देण्याच्या योजना तयार करणे यासाठी श्री रामेश्वर पॅनल बांधील राहील. येत्या 27 तारखेला सभासद मतदारांचे विश्वासावर श्री रामेश्वर पॅनल कपबशी चिन्हावर शिक्के मारून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन विकास दांगट पाटील, बाळासाहेब घुले, देविदास लगड, विकास मते संचालकांनी केले आहे.
100 कोटी पर्यंतचा पसारा असलेली बँक ही योग्य व्यक्तीच्या हातात राहणे गरजेचे असल्याने श्री रामेश्वर पॅनल हीच सभासदांची पहिली पसंती असल्याने मतदारांची भेटीगाठी बैठकांच्या दरम्यान जाणून येत असल्याचे उमेदवार राजेंद्र हगवणे, सचिन दांगट, अभिजीत घुले यांनी सांगितले. श्री रामेश्वर पतसंस्थेची ज्या जयप्रकाश नगर येथे स्थापना झाली तेथील सभासद सुद्धा ठामपणे श्री रामेश्वर पॅनलच्या मागे उभे राहणार आहेत असे बिनविरोध निवडून आलेले विकास कोल्हे, नागेश शिंदे यांनी सांगितले.
विरोधी पॅनलला 13 उमेदवार देखील मिळाले नाहीत. स्वहिताच्या मागण्या पूर्ण न झाल्याने विरोधास विरोध म्हणून त्यांनी पॅनल उभा केला. तो सुद्धा 13 पैकी 7 जागांवर उमेदवार ताकद नसलेले, स्थानिक नसलेले, अनेक अनेक वर्षांचा संस्थेचा संस्थेची काडीमात्र संबंध नसलेले उमेदवार आहेत. श्री रामेश्वर पॅनलचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून येणे ही संचालकांच्या कामाची पावती असल्याचे वीनाताई मते, मनीषा मोरे यांनी विश्वासाने बोलून दाखवले.











