डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असे 7 संदेश, ज्यानं आजही प्रत्येकाचं आयुष्य बदलून जाईल!

0

महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी होते. संपूर्ण भारत देशात ठिकठिकाणी त्यांच्या फोटोची मिरवणूक करून भीम जयंती उत्सव साजरा केला जातो. यंदाही महाराष्ट्रासह भारतातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्या बाबासाहेबांनी कोट्यवधी भारतीयांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले.

त्याच बाबासाहेबांचे उपदेश, संदेश जाणून घेऊ या…

  • डॉ. बाबासाहेबांनी देशात समानता प्रस्थापित करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले. मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो, असे बाबासाहेब म्हणायचे
  • धर्म हा माणसाकरिता नसून माणूस हा धर्माकरिता आहे, असेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेले आहे .
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला होता.
  • एखाद्या समाजातील प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांची प्रगती किती झाली आहे, हे पाहिले पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे.
  • शीलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे.
  • लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नाही. लोकशाही म्हणजे सहजीवनाने राहण्याची एक पद्धत आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे.
  • मी समाजकारण, राजकारणात असलो तरीही मी आजन्म विद्यार्थीच आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.
अधिक वाचा  हैदराबाद गॅझेट जीआरला तात्काळ ‘स्थगिती’स सुप्रीमचा नकार; आता मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार