अजितदादांच्या पुण्यातील नेत्याचे काळे कारनामे पोक्सो चा गुन्हा दाखल; बंगल्यात डान्स बार? धर्मपरिवर्तनाचे रॅकेट?विद्यार्थीनींवर अत्याचाराचा आरोप

0

पुणे शहरात रोज नवीन नवीन गुन्हे घडताना पाहायला मिळत आहे. यातील बऱ्याच गुन्हेगारांवर राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा नेहमीच होत असते. मात्र, आता थेट राजकीय पदाधिकारी असणाऱ्या एकावर गरजू विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. शंतनु कुकडे असे या आरोपीचे नाव आहे.

हा शंतनू कुकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँगेसचा अल्पसंख्यांक विभागाचा राज्य उपाध्यक्ष आहे. या शंतनू कुकडेचा पुणे कॅम्प सारख्या उच्चभ्रू परिसरात एक मोठा बंगला आहे. या बंगल्यामध्ये शंतनु गरजू विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय करतो. काही दिवसांपूर्वी दोन विद्यार्थिनी शंतनु कूकडेच्या या बंगल्यामध्ये राहण्यास आल्या होत्या. त्यातील एक विद्यार्थिनी ही अल्पवयीन होती. या दोन्ही विद्यार्थिनींनी शंतनू कुकडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर कुकडे वर लैंगिक अत्याचाराचा पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शंतनू कुकडे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असतो त्यामुळे अजित पवार यांनी शंतनू कुकडेवर अल्पसंख्यांक विभागाच्या राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

बंगल्यात चालवतो डान्स बार?

शंतनू कुकडेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या काळ्या करणाम्यांची यादीच आता बाहेर आली आहे. कॅम्प परिसरात असणाऱ्या आपल्या बंगल्यामध्ये वरच्या मजल्यावर कुकडे हा डान्सबार चालवत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या बंगल्याबाहेर सायंकाळच्या वेळेमध्ये काही तरुणी उभ्या असतात त्यानंतर आलिशान गाड्यांमधून काही लोक येतात आणि या मुलींमधून पसंत करून त्यापैकी कोणालाही ते आपल्या गाडीमध्ये घेऊन जातात. तर काहीजण वरच्या मजल्यावर डान्सबार मध्ये सुद्धा जातात असा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

धर्मपरिवर्तनाचे रॅकेट?

इतकंच नाही तर हा शंतनू कुकडे धर्म परिवर्तनाचे मोठे रॅकेट चालत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. गरजू मुलींच्या परिस्थितीचा गैरफायदा उचलून हा त्यांचे धर्म परिवर्तन करतो यासाठी कुकडेला आंतरराष्ट्रीय फंडिंग येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी त्याच्यावर पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे. त्यामुळे आता या शंतनू काकड्याची अजित पवारांनी आपल्या पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे.