गुहागर दि. १८ (रामदास धो. गमरे) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळच्या वतीने आयोजित ऋतुरंग २०२४ या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत गिमवी विभाग क्र. ३ चे अध्यक्ष राजेश मोहिते व विभागीय महिला हिशोब तपासनीस सौ. शुभांगी राजेश मोहिते या उभयतांची सुकन्या कु. रुची राजेश मोहिते हिने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.






सेमी इंग्लिश माध्यम, प्राथमिक शाळा मार्गताम्हणे, चिपळूण या शाळेत इयत्ता ४ थी मध्ये शिकणारी कु. रुची राजेश मोहिते ही लहानपणीपासूनच कलासक्त असून अभ्यासू व मेहनती आहे, चित्रकलेत पारंगत रुची अभ्यासासोबतच कलेची आवड जोपासत आपल्या आईवडिलांचे, शाळेचे, गावाचे, विभागाचे, तालुक्याचे नाव उंचावत आहे त्यामुळे बौद्धजन सहकारी संघ, विभाग क्र. ३ च्या वतीने कु. रुची राजेश मोहिते व तिच्या पालकांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले आहे.










