कुराणच्या ‘आयत’ लिहिलेल्या चादरी जाळल्या नाही; नागपूर हिंसाचाराबाबत फडणवीसांची माहिती

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(19 मार्च 2025) नागपूर हिंसाचाराबाबत विधानसभेत महत्वाची माहिती दिली आहे. ‘नागपूर हे नेहमीच शांतताप्रिय शहर राहिले आहे. 1992 च्या जातीय तणावाच्या काळातही शहरात दंगल झाली नाही. मात्र यावेळी काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हिंसाचार भडकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत सोडणार नाही. ते कोणत्याही कबरीत लपले तरी त्यांना कबरीतून बाहेर काढून कारवाई करू,’ असा इशारा फडणवीसांनी यावेळी दिला.

कुराणच्या आयत जाळल्या नाही…

कुराणच्या आयत लिहिलेल्या चादरी जाळल्यामुळे हिंसाचार भडकल्याचा आरोप केला जातोय. याबाबत सीएम फडणवीस म्हणाले की, ‘कुराणच्या आयत लिहिलेल्या चादरी जाळल्या गेल्या नाहीत. काही लोकांनी अफवा पसरवल्या, त्यामुळे नागपूरची परिस्थिती बिघडली. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असून, खोट्या बातम्यांमुळे हा हिंसाचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नागपुरात हिंसाचार पसरवण्यास जो कोणी जबाबदार असेल, त्याला सोडले जाऊ नये, अशा सक्त सूचना मी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. नागपूरची शांतता आणि सद्भावना कोणत्याही किंमतीत बिघडू दिली जाणार नाही,’ असा पुनरुच्चार त्यांनी केला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा