नागपूरमधील हिंसाचाराचा सूत्रधार मानल्या जाणाऱ्या फहीम शमीम खानला पोलिसांनी अटक केली आहे. तो २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. या दंगल प्रकरणी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मोठे खुलासे केले आहे.
यावेळी बोलताना नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल म्हणाले की, नागपुरात झालेल्या दंगली प्रकरणी एकाचे नाव पुढे येत आहे. त्या संदर्भात माहिती तपासून घेतो आहे. त्याचा रेकॉड आहे का? हे देखील तपासले जात आहे. त्याने कुठल्या पोस्ट केल्या आहे का? आंदोलनात भाग घेतला आहे का? हे तपासण्याचे काम करत आहोत.
ते म्हणाले की, आम्ही फहीम खानचा रोल तपासत आहोत. त्याचा हा प्लॅन आधीच होता का? हे तपासत आहोत. यामागे राष्ट्रीय राज्यस्तरीय किंवा लोकल काही लिंक आहेत का हे देखील तपासत आहे. कायदा आणि संस्था अबाधित राखण्याकरता आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत.
नागपूरात सोमवारी रात्री झालेल्या दंगल प्रकरणी आतापर्यंत सहा एफआयआर दाखल झाले आहेत. सर्व प्रकरणात कारवाई सुरू आहे. ज्या लोकांची नावे ह्या प्रकरणात समोर आले आहेत. त्यांना शोधण्याचा काम सुरू करण्यात आले आहे. सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओच्या आणि फोटोच्या आधारे देखील लोकांची चौकशी केली जात आहे. दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीच्या दरम्यान एक महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार पुढे आली आहे. या संदर्भात कारवाई सुरू असून लवकरच माहिती दिली जाईल, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्त म्हणाले की, नागपुरात उसळलेली दंगल ही पूर्वनियोजित होती असं आतापर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे. एकाच वेळी शहरातील काही भागात अशा प्रकारच्या घटना घडल्या. त्यात पेट्रोल बॉम्ब वापरण्यात आले अशी माहिती पुढे येत आहे. यासंदर्भात अधिक चौकशी केल्यानंतरच स्पष्टपणे बोलणं योग्य असेल, असं पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल म्हणाले आहेत.
दगडफेकीच्या घटनेत अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झालेली आहे. त्यामध्ये महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. प्राथमिक तपासात दंगल घडवण्यामागे षडयंत्र दिसून येत आहे. या प्रकरणात कुणीतरी लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला हे देखील दिसून येत आहे. सोशल मीडियावर लोकांना भडकवले त्याचा तपास सुरू आहे. तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घटना घडल्या आहेत. तीनही पोलिसांचे अधिकारी या प्रकरणात तपास करत आहेत, असं त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत एफआयआरमध्ये पुढे आलेले नावं नागपूरची आहेत. मात्र या प्रकरणात बाहेरील लोकांची लिंक देखील उघड होते आहे. यावर आता बोलले संयुक्तीक होणार नाही. संचारबंदी कधीपर्यंत लागू राहील हे सांगणं आत्ताच कठीण आहे. मात्र परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. दंगलीचा पॅटर्न कोणता आहे. हे शोधत आहोत, दगडफेक झाली, आधी दगड नव्हते, ते कुठून आलेत. याचा तपास सुरू आहे.