गाडी धडकताच सीएनजीचा पेट; आग विझवण्यापर्यंत दोघांचा जळून मृत्यू; पोलिसासह दोघांचा जळून कोळसा

0

दुभाजकाला चारचाकी गाडी धडकल्यानंतर वाहनातील सीएनजी गॅसने पेट घेतला आणि गाडीला आग लागली. या भीषण अपघातात दोघा जणांचा जळून अक्षरशः कोळसा झाला. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याही समावेश आहे. अहिल्यानगर येथील बीड रोडवर हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आग विझवण्यात आली, परंतु तोपर्यंत दोघांचा जळून मृत्यू झाला होता.

कसा झाला अपघात?

बीडकडून जामखेडच्या दिशेने आलेली अर्टिगा कार क्रमांक MH 16 DM 5893 ही राऊत मैदानाजवळ कावेरी हॉटेलपाशी डिव्हायडरला धडकली आणि कारला आग लागली. आगीमध्ये २८ वर्षीय महादेव दत्ताराम काळे आणि ३५ वर्षीय धनंजय नरेश गुडवाल हे दोघे जळून मृत्युमुखी पावले आहेत. गुडवाल हे जामखेड पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल होते.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

दोघा जणांचा जळून अक्षरशः कोळसा

नगर जिल्ह्यात जामखेड शहरातील बीड रोडवरील नवले पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. रस्त्यावरील दुभाजकाला चारचाकी वाहन धडकले. त्यामुळे गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतला. गाडीतील दोघा जणांचा जळून अक्षरशः कोळसा झाला.

ही दुर्दैवी घटना आज, सोमवार २४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

जामखेड नगर परिषदेच्या आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारले, मात्र तोपर्यंत गाडीने पूर्ण पेट घेतला होता.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती