दुबई : पाकिस्तानच्या महत्वापूर्ण सामन्यासाठी आता भारताच्या संघात एका मॅचविनर खेळाडूची एंट्री होणार असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी आता रोहित शर्माची चिंता मिटल्याचे पाहायला मिळत आहे.






भारताचा बांगलादेशबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिला सामना झाला होता. या सामन्यात मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेत इतिहास रचला होता, तर अक्षर पटेलची हॅट्रीक हुकली होती. हर्षित राणानेही या सामन्यात दमदार कामगिरी केली होती. फलंदाजी रोहित आणि विराट यांना स्थिरस्थावर झाल्यावरही मोठी खेळी साकारता आली नव्हती. पण शुभमन गिलने शतक साकारत ही कसर भरून काढली होती. पण या सामन्यात जे खेळाडू अपयशी ठरले, त्यांच्याजागी मोठा बदल होऊ शकतो, असे आता समोर येत आहे.
पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवला एकही विकेट मिळवता आली नव्हती. हार्दिक पंड्याही बळी मिळवू शकला नव्हता. फलंदाजीमध्ये श्रेयस अय्यर हा अपयशी ठरला होता, पण आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात गोलंदाजीत मोठा बदल होणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
भारतीय संघात या महत्वाच्या सामन्यासाठी आता गौतम गंभीर यांच्या लाडक्या खेळाडूचा समावेश करण्यात येणार आहे. गौतम गंभीर यांचा लाडका खेळाडू आहे तो वरुण चक्रवर्ती. वरुणने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आपली छाप पाडली होती. त्यामुळे अखेरच्या क्षणी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वरुण चक्रवर्तीचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आता वरुणचा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात समावेश होणार असल्याचे समोर येत आहे. पण वरुणला संघात स्थान देण्यासाठी कोणाला डच्चू देणार, याचा निर्णय भारतीय संघासाठी कठीण असेल. कारण रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यापैकी एकाला भारताला संघाबाहेर करावे लागणार आहे.
वरुण चक्रवर्ती जर संघात आला तर जडेजाला संघाबाहेर करता येईल का, असा विचार सुरु होता. पण रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे जडेजाला संघाबाहेर करता येणार नाही. त्यामुळे जर वरुण चक्रवर्तीला संधी द्यायची असेल तर त्यासाठी कुलदीप यादवलाच संघाबाहेर केले जाऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानविरद्धच्या सामन्यात कुलदीप यादवच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी दिली जाऊ शकते.
पाकिस्तानला सरप्राइज धक्का देण्यासाठी आता भारतीय संघ हा एक मोठा बदल भारताच्या संघात करू शकते, अशी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे भारतीय संघात पाकिस्तानच्या सामन्यासाठी अजून कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागलेली असेल.











