राष्ट्रवादी माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या 1700 पानी चार्टशीट मोठे खुलासे; यापूर्वी 3 ठिकाणी ट्रॅप कोयत्यानं शक्य नव्हतं..

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पुण्यातील नाना पेठ परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास गोळीबार करुन हत्या करण्यात आली होती. मागील वर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी पाच गोळ्या झाडून भर रस्त्यात हल्ला करण्यात आला होता. अशातच या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी 21 आरोपींवर 3400 पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपींनी यापूर्वी तीन ठिकाणी वनराज यांचा खून करण्यासाठी ट्रॅप लावला होता, अशी माहिती समोर आलीये.

 

कोयत्याने शक्य नसल्याने पिस्तुल आणलं

 

पोलिसांनी तपास पुर्णकरून मोक्कानुसार 3400 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं. आरोपींकडून 8 पिस्तूल, 13 जिवंत काडतूसे, 7 कोयते, 7 दुचाकी 3 कार जप्त केल्या होत्या. वनराज आंदेकरचा खून करण्यासाठी अभिषेक खोंड आणि संगम वाघमारे या दोघांनी मध्य प्रदेशाच्या बॉर्डरवरून 8 पिस्तुले, 21 जिवंत काडतुसे विकत आणली होती. कोयत्याने वार करण्याचा प्लॅन तयार केला गेला होता. मात्र, कोयत्याने मारणं शक्य नसल्याने पिस्तुल आणलं अन् तयारी केली गेली. तुषार कदम, आकाश म्हस्के, अनिकेत दुधभाते आणि सागर पवार यांनी सर्व मिळून 1 लाख 60 हजार जमा केले अन् काडतुसे विकत आणली.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

 

गार्डन वडापाव जवळ झाला असता गेम

 

मध्य प्रदेशातून पिस्तुल विकत आणल्यानंतर समीर काळे याने नारायणपूर जवळील माळराणावर फायरींगचा सराव केला होता. पुण्यातील बोपदेव घाटात प्लॅन रचला गेला. तीन वेळा मारण्याचे प्रयत्न फेल गेल्यानंतर चौथ्यांदा प्लॅन यशस्वी ठरला. खून करण्यासाठी दोनदा सापळा रचण्यात आला. पहिल्यांदाच, आरोपींना पवळे चौक कुंभार बावडी येथील कार्यालयाजवळ कुऱ्हाड घेऊन थांबविण्यात आले. नवरात्र उत्सव २०२३ निमित्त वनराज आंदेकर गार्डन वडापाव जवळ आरतीसाठी येणार असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती.

 

कुऱ्हाडीने मारण्याचा कट फसला

 

दुसऱ्यांदा वनराज आंदेकर लग्नासाठी महर्षीनगर येथील मंगल कार्यालयात जाणार होते, परंतु वनराज आंदेकरसोबत असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांच्या गर्दीमुळे हत्येचा कट फसला. वनराज आंदेकर यांना पिस्तूल आणि कुऱ्हाडीने मारण्याचा कट रचला होता. सोमनाथ गायकवाड यांच्या सांगण्यावरून 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. आरोपी दीपक तोरमकर आणि विवेक कदम हे वनराज आंदेकरची रेकी करण्यासाठी दुचाकीवरून नाना पेठेत आले होते.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

 

बियर शॉपसमोर सापळा रचला

 

वनराज आंदेकर आणि शिवम आंदेकर दोघांनाही कूल अँड कूल बियर शॉपसमोर थांबवण्यात आले. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास, आरोपी तुषार कदम, आकाश म्हस्के, समीर हे काळे पिस्तूल घेऊन उभे होते. अजिंक्य सुरवसे, ओम देशखैरे, साहिल केंडले, उमेश किरवे, संगम वाघमारे, अनिकेत दुधभाते, श्री गायकवाड तसेच हातात कुऱ्हाडी घेऊन डबल आणि ट्रिपल सीट बाईकवर आलेले दोन अल्पवयीन मुलेही उपस्थित होते. वनराज आंदेकर यांच्यावर प्रथम गोळीबार करण्यात आला आणि नंतर कुऱ्हाडीने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. तसेच, शिवम आंदेकर याला मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. परंतु शिवम आंदेकर बचावला. शिवमला गोळी लागली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा