पेरिविंकल सूस शाखेचे “स्मृतिगंध” स्नेहसम्मेलन आठवणींचा हिंदोळा! चढता आलेख बघता लवकरच पेरीविंकल विद्यापीठ होईल: डॉ भटकर

0
4

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेचे स्नेहसम्मेलन आज बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी बाणेर येथील बंटारा भवन येथे अत्यंत उत्साहात व जल्लोशात संपन्न झाले. “स्मृतिगंध” म्हणजेच मेमरीज वी चेरीश म्हणजेच आठवणींचा हिंदोळा..या थीम वर आधारित शाळेच्या मुख्याध्यापिका सौं निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

स्मृतिगंध म्हणजेच आठवणींचा मागोवा घेणारे क्षण मग ते अगदी लहानपणीच्या आठवणीचे असोत किंवा तरुणातले आठवण हा एक असा हिंदोळा आहे की आठवणींच्या जगात मन खूप रमते मग त्या लहानपणीच्या असल्या तरी सुद्धा. सण वार हे आपण करतच असतो पण त्या शिवाय शाळेत किंवा आयुष्यात बरेच डेज म्हणजेच दिवस आपण साजरे करतो जसे की मदर्स डे, फादर डे, फ्रेंडशिप डे, पर्यावरण दिन, शिक्षक दिन व या प्रत्येक दिवसाचे महत्व त्या ऍक्ट व डान्स परफॉर्मन्स मधून सूस शाखेच्या चिमुकल्यानी पटवून दिले. मेरी माँ में तेरा लाडला, एकटी एकटी, दमलेल्या बाबाची कहाणी, जंगल जंगल बात चली है, काले मेघा आदी एक से बढ़कर एक गाण्यांवर अत्यंत बहारदार पर्फोर्मँसेस सादर करून प्रेक्षक व पाहुण्यांचे अगदी डोळे दिपवणारे आविष्कार सादर केले.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

अगदी सुरुवातीला राष्ट्रगीताने नाट्यगृहाचा पडदा उघडून कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपरिक सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ व परम संगणकाचे जनक आणि नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भटकर, विक्रांत देशमुख – पोलिस अधिक्षक, राज्य महामार्ग, सुनिल चांदेरे – उपाध्यक्ष PDCC बँक, दिलीप दगडे – संचालक संत तुकाराम सहकारी कारखाना, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका छाया मारणे, दिलीप मुरकुटे – चेअरमन, बाणेर नागरी सहकारी पतसंस्था, उपाध्यक्ष भाजप पुणे शहर – अजय मारणे, मसाजी काळे- उप पोलिस अधिक्षक, निलेश शेंडे – अध्यक्ष पत्रकार संघ मुळशी, रमेश ससार – माजी अध्यक्ष पत्रकार संघ, संस्कार प्रयमरी सकूल च्या संचालिका सौ स्नेहा साठे, सुदर्शन हायस्कूल चेअरमन अविनाश पवळे, चाणक्य academy चे बढे, माऊली म्हेत्रे – पत्रकार न्यूज मेकर चॅनेल, अर्जुन पसाले , नगरसेवक वैभव मुरकुटे, योगेश सोनवणे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राजेंद्रजी बांदल, संचालिका सौ रेखा बांदल , शिवानी बांदल, यशराज बांदल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. नाट्यगृहाच्या अगदी प्रवेश द्वारापासूनच सर्व मान्यवरांचे अत्यंत उत्साहात व थाटात स्वागत करण्यात आले होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्याना “स्टूडेंट ऑफ द इयर हा मानाचा किताब देऊन मुकुट , सर्टिफिकेट व ट्रॉफी प्रदान करून सर्व विद्यार्थ्याचे कौतुक करण्यात आले. यावेळी शाळेतर्फे मान्यवरांना देखील पुष्पगुच्छ व पुणेरी पगडी बहाल करण्यात आली तसेच शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे मानचिन्ह देऊन सर्वांना सन्मानीत करण्यात आले.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांनी शाळेचा चढता आलेख त्यांच्या वार्षिक अहवालात सादर करून वर्षभरात राबवलेल्या सर्व उपक्रमांना उजाळा देऊन यात महत्वाचे योगदान असलेल्या संस्थेचे , शिक्षकांचे ,मान्यवरांचे व पालकांचे आभार मानले व दिवसेंदिवस हा आलेख असाच वाढून आता यूनिवर्सिटी कडे वाटचाल असल्याचे नमूद केले.

तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल यांनी पालकांचा शाळेशी असलेला दृढ विश्वास यातच सर्व काही आले असे सांगून सूस शाखेच्या विद्यार्थ्यांचे पालकांचे मुख्याध्यापिका , शिक्षक व सर्वांचे मनापासून कौतुक करून आज येथे असणारा प्रत्येक विद्यार्थी मोठाच होणार व या व्यासपीठावर आज बसलेल्या सर्व मान्यवरांचा आदर्श ठेऊन उद्या अनेक मान्यवर या शाखेमधून निर्माण होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला.
तसेच खरच लहान लावलेल्या पेरिविंकल च्या रोपट्याचे वटवृक्षात्त रूपांतर होत असताना बघून खूप अभिमान वाटतो व सर्व शिक्षक व विद्यार्थी हे कलागुण असलेले आहेत हे सर्वांच्या सादरीकरण याच्यातून दिसून आले असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक मा. विक्रांत देशमुख यांनी केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका नेहा माळवदे ,सचिन खोडके कोरिओग्राफर शिवप्रसाद पुजारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध पध्तीने करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं. प्रफुल्ला पाटील व इयत्ता ५वी ते ११वी च्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाची सांगता गरजा महाराष्ट्र माझा या राज्य गीताने करण्यात आली.