मकर संक्रांत बाप-लेकाच्या मिलनाशीही निगडित उद्या कोणत्या वाहनावर? कोणत्या गोष्टींवर प्रभाव? जाणून घ्या

0

नवं वर्षाच्या जानेवारी महिन्यात महत्वाचा आणि मोठा सण म्हणून मकर संक्रांतीची ओळख आहे. त्यात मकर संक्रांत हा सण संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. १४ जानेवारी म्हणजेच उद्या सकाळी ८ वाजवून ४१ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. तसेच स्थानिक वेळेनुसार यात फरक पडणार असून सूर्य देव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. त्यात शनि हा कुंभ राशीचा स्वामी आहे. सूर्यदेव हे शनिदेवाचे पिता आहेत. त्यामुळे हा सण बाप-लेकाच्या अनोख्या मिलनाशीही निगडित आहे. चला तर मग जाणून घेऊया यंदा मकर संक्रांतीला कोणते वाहन येणार आहे, त्याचा काय परिणाम होईल?

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मकर संक्रांतीचे वाहन

यंदा मकर संक्रांतीचे मुख्य वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असणार आहे.

मकर संक्रांतीचे प्रभाव : प्रभाव हा धार्मिक मान्यतेनुसार संक्रांतीच्या वाहनाचा समाजावर आणि निसर्गावर विशेष प्रभाव पडतो.

वाघांच्या वाहनांच्या उपस्थितीमुळे यंदा सोने, चांदी, तांदूळ, दूध, डाळी आदींच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर राजाच्या विरोधाची भावना वाढू शकते, पुरोहित वर्ग, भिक्षू आणि जनतेला त्रास होऊ शकतो.

भ्रष्टाचार वाढण्याची आणि देशाच्या कर्जात वाढ होण्याची शक्यता आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे ?

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याची परंपरा आहे, हा या सणाचा महत्त्वाचा भाग आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

या दिवशी पवित्र नदीत तिळाने स्नान करणे आणि तीळ, ब्लँकेट आणि कपडे इत्यादींचे दान करणे शुभ मानले जाते.

ही परंपरा सूर्याच्या उत्तरायणाच्या आनंदात साजरी केली जाते, ज्यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह संचारतो.

यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवल्यास विशेष फायदा होऊ शकतो.

मकर संक्रांत सणाची परंपरा :

मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ व इतर गोड पदार्थांपासून बनवलेले लाडू बनवून खाण्यापिण्याची परंपरा संपूर्ण महाराष्ट्रात आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची ही परंपरा विशेषतः गुजरातमध्ये पतंगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.

मकर संक्रांतीला गायीला हिरवा चारा खायला देण्याची सुद्धा परंपरा आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मकर संक्रांतीला विष्णूपूजेसह सूर्याला अर्घ्य देण्याची आणि शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे.

मकर संक्रांतीनिमित्त देशातील अनेक शहरांमध्ये जत्रा भरते.

मकर संक्रांतीला तीर्थयात्रा, नदी स्नान आणि दान तसेच पितृतर्पण करण्याची परंपरा आहे.

(तळटीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)