समस्त पुणेकरांसाठी अभिमानाचा क्षण पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, पहिल्या खो खो विश्वचषकाची धुरा प्रतिककडेचं

0

आजपासून राजधानी दिल्लीमध्ये खो खो विश्वचषकाच्या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारतीय संघाची धुरा पुण्याच्या प्रतिक वायकर याच्याकडे सोपवण्यात आली आहे. खो खो विश्वचषकाच्या पहिल्या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व प्रतिक वायकर करणार आहे. तर महिला संघाची धुरा बीडची लेक प्रियंका इंगळे करणार आहे. खो खो संघाच्या दोन्ही संघाचे नेतृत्व महाराष्ट्रातील खेळाडू करत आहेत.

खो – खो च्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कॅप्टन म्हणून पुण्याच्या प्रतीक वाईकर याची निवड करण्यात आली आहे. हा समस्त पुणेकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया येत आहे. पहिल्यांदाच होत आलेल्या खो – खो विश्वचषकाच्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी प्रतीक वायकरची निवड झाली आहे. कसबाचे आमदार हेमंत रासणे यांनी फोनद्वारे त्यांच्याशी संवाद साधून त्याला आणि संपूर्ण खो-खो संघाला कसबा मतदारसंघाच्या वतीने तसेच सर्व पुणेकरांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

राजधानी नवी दिल्ली 13 जानेवारीपासून पहिल्या खो-खो विश्वचषकाला सुरुवात होतेय. भारतीय पुरुष संघ नेपाळ, पेरू, ब्राझील आणि भूटानसह ग्रुप अ मध्ये आहे. भारतीय संघाची धुरा पुण्याचा प्रतिक याच्या खांद्यावर आहे.

खो-खो विश्वचषकासाठी भारतीय पुरुष संघ –

सुयश गर्गाटे, प्रतिक वायकर (कर्णधार), रामजी कश्यप, शिवा पोटिर रेड्डी, प्रभानी साबर, मेहुल, सचिन भार्गो, आदित्य गणपुले, गौतम एमके, निखिल बी, आकाश कुमार, सुब्रमणि वी, सुमन बर्मन, अनिकेत पोटे, एस रोक्सन सिंह; राखीव – विष्णुनाथ जनकीराम, अक्षय बांगरे, राजवर्धन शंकर पाटील यांचा समावेश आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

कोण आहे प्रतिक वाईकर?

प्रतिक हा पुण्यातील नूमवि प्रशालेचा विद्यार्थी असून एस पी कॉलेज मध्ये त्याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने खो-खो खेळायला सुरुवात केली. त्याची खेळातील प्रगती पाहून पुण्यातील नामांकित नवमहाराष्ट्र संघाने त्याला त्यांच्या संघात समाविष्ट करून घेतले.

वयाच्या 19 व्या वर्षी त्याला महाराष्ट्र राज्य वीज मंडळात नोकरी मिळाली. खो खो मधील त्याच्या कामगिरी बद्दल सांगायचं तर वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये तब्बल 10 पदके त्याने जिंकली असून, त्यात तीन सुवर्ण व सात रौप्य पदके आहेत. प्रतिकच्या नावावर एकलव्य पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सुद्धा त्याला देण्यात आला आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन