राहुल गांधी महाराष्ट्रात येणार वातावरण पेटणार?; भाजपा-काँग्रेसचा काय इशारा…

0

मुंबई – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. त्यात महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या भेटीलाही राहुल गांधी येणार असल्याचे पुढे आले. त्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींनी महाराष्ट्राची माफी मागावी मगच यावं असं म्हटलं त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला प्रतिइशारा दिला आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जर भाजपावाले राहुल गांधींना चॅलेंज करत असतील. तर राहुल गांधी आता महाराष्ट्रात येणार आहेत. जर धमक असेल तर त्यांच्या केसालाही धक्का लावून पाहा, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. परंतु परंपरेला गालबोट लावायची हिंमत भाजपा करत असेल तर जशाला तसं उत्तर देण्याची भूमिका काँग्रेसची आहे असं त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

तसेच मी सावरकर नाही, राहुल गांधी आहे हा गुन्हा होत असेल तर तो आम्ही वारंवार करू. लोकसभेत शेतकऱ्यांना खालिस्तानी, आंदोलनजीवी असं पंतप्रधान म्हणाले. त्या नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांची माफी मागितली का? छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला त्यांनी माफी मागितली का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरूणांच्या आत्महत्या, महागाई वाढवली, देशातील जनतेची माफी भाजपाने मागितली पाहिजे असंही त्यांनी मागणी केली.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
५ वेळा जाणीवपूर्वक राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला, महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याची माफी मागावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तर राहुल गांधी मातोश्रीवर येतील यावर माझा विश्वास नाही. राहुल गांधी सत्ता नसताना ठाकरेंना भेटायला येतील असं वाटत नाही. मात्र यामागे काय राजकारण आहे ते शरद पवारच सांगू शकतील असा टोला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

संजय राऊत म्हणतात…
वीर सावरकरांचे विचार वाचा, समजून घ्या आणि तुम्ही किती सावरकरांच्या विचारांचे पालन करता ते पाहा असं सांगत संजय राऊतांनी बावनकुळेंच्या इशाऱ्यावर भाष्य केले आहे.