अजितदादांच्या ‘त्या’ आमदाराकडून थोपटेंना डबल धक्का; निवडणुकीत धोबीपछाड, आता खास शिलेदारचं फोडला!

0

पुणे जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले. त्यात भोर विधानसभा ही महत्वाची मानली जाते. कारण, तीन टर्म आमदार राहिलेले संग्राम थोपटे यांचे वर्चस्व संपवण्यात अजितदादांनी टाकलेला डाव हा यशस्वी झाला आणि नव्या उमेदीचा शंकर मांडेकर नावाचा उमेदवार संग्राम थोपटे यांच्या विरोधात उभा केला. त्याने देखील अजितदादांचा विश्वास सार्थ ठरवत संग्राम थोपटे यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला. त्यामुळे भोर विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने आपले स्थान निर्माण केले. आता त्याच शिलेदाराने संग्राम थोपटे यांच्या वर्चस्वाला पुन्हा एकदा धक्का लावला आहे. अनेक वर्षांपासून संग्राम थोपटें यांच्याशी एकनिष्ठ असणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमोल नलावडे यांना मांडेकर यांनी आपल्या ताफ्यात घेऊन अनेक पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे भोर विधानसभेत काँग्रेसला खिंडार पडले आहे. पुण्यातल्या सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत अमोल नलावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने अजितदादा पवार यांची ताकत वाढली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

कोण आहेत अमोल नलावडे?

अमोल नलावडे यांची संग्राम थोपटे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख आहे. भोर, वेल्हा विधानसभा मतदार संघात त्यांचे चांगले संघटन आहे. गेल्या वेळी संग्राम थोपटे यांच्या विजयात अमोल नलावडे यांचा मोठा वाटा होता. अमोल नलावडे हे तालुक्यातील कुरण खुर्द विंझर गटातून २०१७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. याशिवाय, २०१२ मध्ये त्यांच्या पत्नी वसुधा अमोल नलावडे या जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे सलग दहा वर्षापासून जिल्हा परिषदेची सत्ता त्यांच्या घरात आहे. त्यांनी त्यांच्या गटात अनेक विकास कामे केली असून एक चांगला लोक प्रतिनिधी म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. मात्र, अमोल नलावडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने संग्राम थोपटें यांच्याशी एकनिष्ठ असलेला शिलेदार मांडेकर यांनी फोडल्याने भोरमध्ये काँग्रेसला खिंडार पडले आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

या प्रवेशाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार शंकर मांडेकर ,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर ,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष किरण राऊत, कात्रज दूध संघाचे चेअरमन भगवान पासलकर ,राजगड साखर कारखाना करण्याचे संचालक प्रताप शिळीमकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप खुटवड उपस्थित होते.

तर माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांच्यासोबत माजी सभापती रघुनाथ कथुरे, अशोक उर्फ लाला रेणुसे, सरपंच सचिन पिलाने ,सुरेश नलावडे, गणेश भिलारे, विलास दसवडकर, सचिन भदे, राहुल मळेकर, रामभाऊ रेणुसे, बळीराम आधवडे, सुनील आधवडे, अण्णा आधवडे ,अनंता बिरामणे, विनोद बिरामणे, अमोल जागडे, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती