प्रेम केल्याची शिक्षा, राग आला अन भावाने बहिणीला डोंगरावरून ढकललं; कुठे घडला ऑनर किलींगचा थरारक प्रकार ?

0

प्रेम… ही जगातील सर्वात चांगली, महत्वाची भावना समजली जाते, आप्लायवर कोणीतरी प्रेम करावं, असं जगातील प्रत्येत व्यक्तीला वाटत असतं. पण याच प्रेमामुळे एखाद्याचा जीव गेला तर ? प्रेम करण्याची जीवघेणी शिक्षा कोणी दिली तर कोणाकडे दाद मागायची ? आपल्या बहिणीने गावातील एक तरूणावर प्रेम केल्याने एका भावाला एवढा प्रचंड राग आला की त्याने त्याच्या बहिणीलाच प्रेम करण्याची शिक्षा देत तिला 200 फूट उंच डोंगरावरून खाली खोली दरीत ढकलून दिलं. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथे घडली असून त्यामध्ये अवघ्या 17 वर्षांच्या त्या मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरूणाला अटक केली आहे. मृत मुलगी ही त्याची चुलत बहीण होती. ‘ऑनर किलींग’च्या या घटनेने फक्त वाळूजच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून मोठी खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

200 फूट डोंगरावरून खाली ढकललं

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,वडगाव येथील अवघ्या 17 वर्षांची असलेली ही मुलगी 12 वीमध्ये शिकत होती. तिचे एका वेगळ्या जातीतील मुलावर प्रेम होतं. ती त्याच्यासोबत पळूनही गेली होती, मात्र तिच्या घरच्यांना हे मुळीच आवडलं नव्हतं. त्यांनी त्या मुलीची कशीबशी समजूत काढून तिला घरी आणलं होतं. त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला वाळूज परिसरातील वळदगाव येथे तिच्या काकांकडे पाठवलं होतं. काकांनी व तिच्या चुलतभावाने, ऋषीकेशने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता.

फिरायला नेतो सांगितलं आणि…

मात्र तरीही ती मुलगी ऐकत नव्हती. घटनेच्या दिवशी त्या मुलीचा चुलत भाऊ ऋषीकेश हा तिला फिरायला घेऊन गेला. तो तिला सोलापूर-धुळे महामार्गाजवळील खवड्या डोंगरावर घेऊन गेला. तिथेही त्याने त्या मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती काहीच ऐकत नव्हती, हे पाहून तिच्या भावा खूप राग आला. आणि त्याच रागाच्या भरात त्याने त्याच्या बहिणीला डोंगरावरून खाली दरीत ढकलून दिलं. त्यामुळे त्या तरूणीचा मृत्यू झाला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

बहिणीला ढकलून तो डोंगरावरन खाली येत होता, तेव्हा तिथे क्रिकेट मॅच सुरू होती. तेथील ड्रोनमध्ये तो आरोपी तरूण कैद झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.