अमेरिकन कोर्टातून अदानींबाबत मोठी बातमी; एकाच वेळी तीन खटल्याची सुनावणी होणार, शेअर्स कोसळले

0

अमेरिकेतील उद्योगपती गौतम अदानी आणि इतरांवरील लाचखोरीच्या आरोपांबाबात मोठी अपडेट समोर येत आहे. न्यूयॉर्कच्या कोर्टाने सर्व तीन प्रकरणांची एकाचवेळी सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशात तिन्ही प्रकरणांची एकत्रित सुनावणी एकाच न्यायालयात करावी, असे म्हटले होते. तिन्ही प्रकरणे एकच आरोप आणि व्यवहारांशी संबंधित असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला. नंतर तिन्ही खटले एकाच न्यायालयाकडे सोपवण्यात आले.

कोणत्याही प्रकारचा संघर्ष होऊ नये म्हणून ही प्रकरणे एकाच न्यायाधीशासमोर ठेवण्यात आली आहेत. अदानी समूहाविरुद्ध लाचखोरीच्या आरोपांशी संबंधित दिवाणी आणि फौजदारी खटला यूएस जिल्हा न्यायाधीश गारोफिस यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

या खटल्यांची सुनावणी एकत्रितपणे केली जाईल. याचा सरळ अर्थ असा की, दिवाणी आणि फौजदारी खटल्यांची सुनावणी करून तेच न्यायालय आदेश जारी करेल.

दिवाणी आणि फौजदारी खटले एका न्यायाधीशाकडे

यूएस जस्टिस डिपार्टमेंटच्या प्रवक्त्याने सांगितले की, यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनसमोर दाखल करण्यात आलेला दिवाणी खटला आणि न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टसमोर दाखल करण्यात आलेला फौजदारी खटला आता न्यायाधीशांकडे सोपवण्यात आला आहे. परंतु दोन्ही प्रकरणांचे एकत्रीकरण झालेले नाही.

नोव्हेंबरमध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन वकिलांनी लाचखोरीचा आरोप केला होता. या वृत्तानंतर शेअर बाजारात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

अलीकडेच गौतम अदानी आणि त्यांच्या काही साथीदारांवर अमेरिकेत आरोप झाले होते की त्यांनी सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी सुमारे 2300 कोटी रुपयांची लाच दिली होती.

ज्या गुंतवणूकदारांकडून आणि अमेरिकन बँकांकडून या प्रकल्पासाठी पैसा उभा करण्यात आला होता, त्यांच्यापासून ही वस्तुस्थिती लपवण्यात आल्याचा आरोपही अमेरिकन वकिलांनी केला आहे. अदानी समूहाच्या वतीने हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ते नेहमीच कायद्याचे पालन करतात आणि असे काहीही केलेले नाही, असे ग्रुपने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.