हिवाळी अधिवेशनाला न फिरकलेल्या 17 आमदारांच्या प्रस्तावावर सह्या? भास्कर जाधवांचा खळबळजनक आरोप

0

सत्ताधाऱ्यांच्या 293च्या प्रस्तावावर 86 आमदारांच्या सह्या आहेत. मात्र प्रत्यक्षात 86 पैकी 17 आमदार अद्याप अधिवेशनाला आले नसल्याची गंभीर बाब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडून उघड करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाला न फिरकलेल्या आमदारांच्या प्रस्तावावर सह्या कशा? असा सवाल करत विधानसभा अध्यक्षांनी याचे उत्तर द्यावं, अशी मागणी ही भास्कर जाधव यांनी केली आहे.

मी हा मुद्दा उपस्थित केल्याने सत्ताधाऱ्यांनी याला विरोध केला. मात्र मी हजेरीपट काढून 17 सदस्य हे अधिवेशनाला अनुपस्थित राहून सुद्धा प्रस्तावावर सह्या झाल्याच सिद्ध केल असल्याचे ही भास्कर जाधव म्हणाले. तर सत्ताधाऱ्यांच्या या प्रस्तावावर बनावट सह्या केल्याचा आरोप करत भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. या सह्या प्रस्तावावर जर आमदार उपस्थित नसतील तर कोणी केल्या? हे समोर आणावं. अशी मागणी भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मी अजित पवारांना खोगोची गोळी देणार- भास्कर जाधव

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून दोन दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गायब असल्याची चर्च रंगत होती. नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाला देखील अजित पवार अनुपस्थितीत राहिले. घशाला त्रास होत असल्याने डॉक्टरांनी अजित पवारांना विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. मात्र छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अजित पवारांनी माध्यमांपासून दूर राहणं पसंत केल्याची देखील राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, अजित पवार आज हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले आहे. यावरुनच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. अजितदादा यांचा घसा खराब असल्याने मी त्यांना खोगोची गोळी देणार आहे, ती अजित पवारांनी घशात ठेवावी, असा मिश्किल टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

शिवसेनेला गृह खात्याऐवजी नगर विकास आणि गृहनिर्माण खातं-

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नगरविकास खाते मिळणार आहे. तर गृहनिर्माण, उद्योग, पर्यटन ही महत्वाची खातीही शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत. तसेच आरोग्य, शालेय शिक्षण खातेही शिवसेनेकडेच कायम राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम(सा.उपक्रम वगळून ),पाणीपुरवठा खातंही शिवसेनेकडेच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. जल संधारण, मराठी भाषा, खणीकर्म, माजी सैनिक कल्याण खातीही शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सुरुवातीपासून गृहमंत्री खातं शिवसेनेच्या वाट्याला यावं, यासाठी आग्रही होते. परंतु गृह खातं भाजपकडेच राहणार आहे. गृह खात्याऐवजी नगर विकास आणि गृहनिर्माण शिवसेनेला देण्यात आले आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा