फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भाचं पारडं जड; या 4 बहिणीची एण्ट्री! हा फॉर्म्युला?

0

नागपूर : नवं सरकार निवडून आल्यावर सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची घटिका समीप आली आहे. नव्या सरकाराच्या नव्या मंत्रीमंडळातून काही नवे सरप्राईजेस मिळण्याची शक्यता व्यक्त होतेय. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना आता वेग आला आहे, पण हा मंत्रिमंडळ विस्तार करातना महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून प्रादेशिक समतोल साधण्याचा कसोशीनं प्रयत्न होताना दिसतोय. सोबतच लाडक्या बहिणींनाही हे सरकार मानाचं पान देणार का? याचीही उत्सुकता आहे. प्रादेशिक आणि जातीय समीकरणांसोबत पक्षवाढीसाठी फायदेशीर ठरण्याऱ्या नेत्यांना प्राध्यान्य मिळण्याची शक्यता व्यक्त होतेय.

मंत्रिमंडळात 4 महिला फिक्स

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या 20 महिला आमदार विजयी झाल्या. यात भाजपाच्या 14, शिंदेच्या शिवसेनेच्या 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 आमदारांचा समावेश आहे. सध्या ज्या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी फिक्स मानली जात आहेत त्यात भाजपाकडून माधुरी मिसाळ आणि पंकजा मुंडे, शिवसेनेकडून भावना गवळी आणि राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांच्या नावांचा समावेश असल्याचं कळतंय.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मंत्रिमंडळाच्या स्थापनेत सरकारला प्रादेशिक समतोलाचीही कसरत करावी लागणार आहे. मंत्रिपदासाठी चर्चेत असलेल्या नावांचा विचार करता मंत्रिमडळात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचं पारडं जड दिसतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोकण विभागात 5 मंत्रीपदं, पश्चिम महाराष्ट्रात 8 मंत्रिपदं, विदर्भात 4 ते 5 मंत्रिपदं, मुंबईत 5, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रत्येकी 6 मंत्रिपदं विभागली जाण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय?

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला अखेर ठरल्याची माहिती समोर आली आहे. या फॉर्म्युल्यानुसार, भाजपकडे 22 मंत्रिपदे असणार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 12, अजितदादांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गृह खातं हे भाजपकडेच असणार आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

भाजपला 18 कॅबिनेट तर 4 ते 5 राज्यमंत्रीपद मिळणार आहे. तर, शिवसेनेला 9 कॅबिनेट तर 2 ते 3 राज्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीला 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुतीला निवडणुकीत प्रचंड मोठं यश मिळालंय. मंत्रिपद पदरात पाडण्यासाठी इच्छुकांचं लॉबिंगही सुरु झालंय, त्यामुळे नाराजी आणि कुरबुरी थोपवून महायुतीकडून मंत्रिपदाचा कोट कुणा कुणाच्या अंगावर चढवला जातो, याची महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे.