शरद पवारांनी सरकार स्थापनेचा हा आकडाच सांगितला; ‘मविआ’चा ‘कॉन्फिडन्स’ वाढला

0
1

विधानसभेची मतमोजणी उद्या होत असतानाच, तत्पूर्वी एक्झिट पोल यांनी सरकार कोण स्थापन करणार याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते देखील सरकार स्थापनेसाठी लागत असलेल्या जादुई आकड्यांच्यावर आकडे जाहीर करत आहे. परंतु यात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्याच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीर घेतलेल्या बैठकीत महाविकास आघाडीत मिळवत असलेल्या आकडा जाहीर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा ‘कॉन्फिडंट’ वाढला आहे.

शरद पवार यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेतली. या बैठकीत महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. राज्यात महाविकास आघाडी 157 जागांवर विजयी होईल, असे सांगून मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण खबरदारी घेण्याच्या सूचना देखील शरद पवार यांनी केल्या.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी होत आहे. त्यापार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षांनी सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून सरकार स्थापनेसाठी लागत असलेल्या आकडेंवर भाष्य केले जात आहे. एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच काही कल देखील महाविकास आघाडीच्या बाजूने दाखवले जात आहे.

महायुतीचे नेते आकडेवारी सांगत असतानाच, महाविकास आघाडीचे नेते सरासरी आकडा एकमेकांच्या जवळपास सांगत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी 160 जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा अंदाज व्यक्त केला आहेत. काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील 155 ते 160 जागेचा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी देखील 152 ते 160 जागा जिंकेल असे सांगत आहेत.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी मतमोजणीच्या आदल्या दिवसांपासून अ‍ॅक्शन मोडमध्ये आली असून, सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना आमदारांना देत आहे. विजयाचे प्रमाणपत्र घेईपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका, अशा सूचना काँग्रेसकडून देण्यात आल्या आहेत.

तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील ऑनलाइन बैठक घेत, उमेदवार, नेते,उपनेते, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांना मतमोजणीच्या दिवशी कोणत्या खबरदारी, काळजी घ्यायच्या याच्या सूचना दिल्या. या सूचना देत असताना उद्धव ठाकरे यांनी देखील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या!