रोहित पाटील सर्वात तरुण 25 ते 35 वयोगट 10 आमदार! महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी

0

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात 78 आमदारांना गुलाल लागला आहे. राज्याच्या विधानसभेत तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले रोहित पाटील सर्वात तरुण आमदार आहेत. त्यामुळे 288 सदस्यांमध्ये 27 टक्के पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करत असलेल्या आमदारांचा समावेश आहे.15 व्या महाराष्ट्र विधानसभेत 25-45 वयोगटातील केवळ 57 आमदार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे 10 आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. काँग्रेसचे 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 6 आमदार निवडून आले आहेत.

रोहित पाटील सर्वात तरुण आमदार

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे रोहित पाटील महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात तरुण आमदार आहेत. त्यांची मुख्य व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 15व्या महाराष्ट्र विधानसभेत 25-45 वयोगटातील केवळ 57 आमदार आहेत. 1970 नंतर प्रथमच ही संख्या खाली आली आहे. मुंबईमधील 36 पैकी 9 आमदारांनी पहिल्याच प्रयत्नात विजय खेचून आणला आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचा समावेश आहे, ज्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि माहीमचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचा पराभव केला. वांद्रे पूर्वमध्ये राष्ट्रवादीचे झीशान सिद्दीकी यांचा पराभव करणारे वरुण सरदेसाई यांचाही या यादीत समावेश आहे. मनोज जामसुतकर (भायखळा), अनंत नर (जोगेश्वरी पूर्व) आणि हारून खान (वर्सोवा) हे सुद्धा पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. बोरिवलीतून विजयी झालेले भाजपचे संजय उपाध्याय, अंधेरी पूर्व मतदारसंघातून मुरजी पटेल, अणुशक्तीनगरमधून राष्ट्रवादीच्या सना मलिक, धारावीतून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड प्रथमच आमदार झाले आहेत. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या भोकरमधून पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव पाचपुते यांचा मुलगा विक्रम हे भाजपच्या तिकीटावर श्रीगोंदा येथून विजयी झाले आहेत. त्यांचाही हा पहिला विजय आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

कराड दक्षिणमध्ये भाजपचे अतुल भोसले सुद्धा पहिल्यांदा आमदार झाले असून त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. अतुल भोसले काँग्रेस नेते दिलीप देशमुख यांचे जावई आहेत. आर्वी मतदारसंघातून विजयी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.खानापूरमधून विजयी झालेले शिवसेनेचे माजी आमदार अनिल बाबर यांचा मुलगा सुहास, पैठणमधून खासदार संदिपान भुमरे यांचा मुलगा विलास, एरंडोलमधून विजयी झालेले माजी आमदार चिमणराव पाटील यांचा मुलगा अमोल यांचाही या यादीत समावेश आहे.

भाजपचे पहिल्यांदा निवडून आलेले आमदार

शंकर जगताप – चिंचवड

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

राजन नाईक – नालासोपारा

राघवेंद्र पाटील – धुळे ग्रामीण

संजय उपाध्याय – बोरिवली

अतुल बाबा भोसले – कराड दक्षिण

अनुराधा चव्हाण – फुलंब्री

मनोज घोरपडे – कराड उत्तर

श्रीजया चव्हाण – भोकर

राहुल आवाडे – इचलकरंजी

श्याम खोडे – वाशिम

मिलिंद नरोटे – गडचिरोली

अनुप अग्रवाल – धुळे शहर

हरीशचंद्र भोये – विक्रमगड

अमोल जावळे – रावेर

देवेंद्र कोथे- सोलापूर शहर मध्य

किसन वानखडे – उमरखेड

चरणसिंह बाबुलालजी ठाकूर – काटोल

सुमित वानखेडे – आर्वी

विक्रम पाचपुते – श्रीगोंदा

उमेश यावलकर – मोर्शी

राजेश वानखेडे – तिवसा

राजेश बकाने – देवळी

हेमंत रासने – कसबा पेठ

सई डहाके – कारंजा

सुलभा गायकवाड- कल्याण पूर्व

प्रवीण तायडे – अचलपूर

स्नेहा दुबे पंडीत – वसई

देवराव विठोबा भोंगळे – राजुरा

करण देवतळे – वरोरा

शिवसेना ठाकरे गट पहिल्यांदा निवडून आलेले आमदार

वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व

महेश सावंत -माहीम

मनोज जामसूतकर -भायखळा

हारून खान – वर्सोवा

अनंत बाळा नर – जोगेश्वरी

सिद्धार्थ खरात -मेहेकर

गजानन लवटे -दर्यापूर

संजय देरकर -वणी

प्रवीण स्वामी -उमरगा

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

बालाजी काळे -खेड

शरद पवार राष्ट्रवादी पहिल्यांदा निवडून आलेले आमदार

उत्तमराव जानकर- माळशिरस

रोहित पाटील- तासगाव कवठे महांकाळ

बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी

अभिजित पाटील- माढा

नारायण पाटील- करमाळा

राजू खरे- मोहोळ

अजित पवार राष्ट्रवादी पहिल्यांदा निवडून आलेले आमदार

सिंदखेडराजा- मनोज कायंदे

अणुशक्तीनगर – सना मलिक

शिरूर – माउली कटके

भोर – शंकर मांडेकर

पारनेर – काशिनाथ दाते

गेवराई – विजयसिंह पंडित

फलटण – सचिन पाटिल

पाथरी- राजेश विटेकर

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल

महायुती- 237 मविआ- 49 अपक्ष/इतर – 02

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा

भाजप- 132 शिवसेना (शिंदे गट)- 57

राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41

काँग्रेस- 16 राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10

शिवसेना (ठाकरे गट)- 20

समाजवादी पार्टी- 2

जन सुराज्य शक्ती- 2

राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1

राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1

एमआयएम- 1 जागा

सीपीआय (एम)- 1

पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1

राजर्षी शाहू विकास आघाडी- 1

अपक्ष- 2

भाजपला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष

जनसुराज्य शक्ती – 2

युवा स्वाभिमान -1

रासप- 1

अपक्ष – 1 (शिवाजी पाटील- चंदगड)

भाजपचे एकूण संख्याबळ 132+5 = 137