राज्यसभेत आज मोठे महाभारत घडले. काँग्रेसच्या बाकड्यावर नोटांचे बंडल सापडले. त्यामुळे एकच गोंधळ सुरू झाला. राज्यसभेच्या सभापतींनी याविषयीची माहिती दिल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. सभापतींनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगीतले. तसेच या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले. यापूर्वी सुद्धा सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी खासदारांवर पैसे घेतल्याचा आरोप करण्याच्या घटना घडल्या होत्या. आज नोटांचे बंडल सापडल्यानंतर त्याच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात येत आहे.






शुक्रवारी राज्यसभेचे सबापती जगदीप धनखड यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानुसार, गुरुवारी सभागृहातील कामकाज थांबवल्यानंतर सुरक्षा अधिकार्यांनी आम्हाला माहिती दिली की, आसन क्रमांक 222 या ठिकाणाहून रोख रक्कम मिळाली. ही जागा तेलंगणाचे खासदार, सभागृहाचे सदस्य अभिषेक मनू सिंघवी यांची असल्याचे त्यांनी सांगीतले. या सर्व प्रकरणाची नियमानुसार चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतला आक्षेप
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी नोटांचे बंडल सापडल्याची माहिती दिल्यानंतर आणि काँग्रेस खासदारांचे नाव घेतल्यानंतर विरोधकांनी सभागृहात एकच हंगामा सुरू केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सभापतींनी घेतलेल्या नावावर आक्षेप नोंदवला. जोपर्यंत संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही. सर्वच गोष्टी समोर येत नाही. तोपर्यंत सभापती महोदयांनी अभिषेक मनू सिंघवी यांचे नाव घ्यायला नको होते, अशी भूमिका खरगे यांनी जाहीर केली.
यावेळी खरगे यांनी सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतले. असे चिल्लर काम करून आता देशाला बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचा घणाघात त्यांनी घातला. सभापती एखाद्या सदस्याचे नाव घेऊन आणि त्याचा आसन क्रमांक कसा जाहीर करू शकतात? असा सवाल त्यांनी केला. खरगे यांच्या आरोपानंतर धनखड यांनी त्यांची बाजू मांडली. आपण केवळ ही रक्कम कुठे आणि कोणत्या क्रमांकाच्या आसनावर सापडली इतकेच सांगितल्याचे ते म्हणाले.
अभिषेक मनू सिंघवी म्हणाले काय?
“पहिल्यांदाच असं काही ऐकतोय. मी जेव्हा पण राज्यसभेत जातो तेव्हा एक 500 रुपयांची नोट सोबत घेऊन जातो. मी काल दुपारी 12.57 वाजता घरी पोहचलो आणि 1 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले. मी 1:30 वाजेपर्यंत कँटीनमध्ये होतो. त्यावेळी खासदार अयोध्या रामी रेड्डी सोबत होते. त्यानंतर मी सभागृहात गेलो.” दरम्यान ज्यांच्या आसन क्रमांकावरून हे नोटांचं बंडल मिळाले. ते अभिषेक मनू सिंघवी यांनी पण या प्रकरणात अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी ट्वीट करुन त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.










