2019 ला राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा नेमकं काय घडलं?; पत्र कुणी लिहिलं? फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

0

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. ही राष्ट्रपती राजवट नेमकी कुणाच्या सांगण्यावरून लागली? याबाबत प्रचंड चर्चा होत आहे. राज्यात जी राष्ट्रपती राजवटी लागू झाली ती शरद पवार यांच्या पत्रामुळे लागू झाली, असं देवेंद्र फडणवीस यांनी एकेठिकाणी बोलताना म्हटलं. शरद पवार यांनी मोजक्या शब्दात देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर टिपण्णी केली. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. झालेल्या मुलाखतीत फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?
मी फडणवीस यांचा आभारी आहे. मी सत्तेत नव्हतो. माझ्याकडे काही संस्थेचं सदस्यत्व नाही की, मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागते. तरी मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागते. याचा अर्थ त्यांनी ओळखलं पाहिजे की, राजकारणात माझं स्थान काय आहे, असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर प्रतिवार केला होता. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

आमची जी एकत्र बैठक झाली ती शरद पवार यांनी मान्य केली. या बैठकीत असं ठरलं की थोडा वेळ घालवायचा. म्हणजे मग राष्ट्रपती राजवट लावता येते. राज्यपाल प्रत्येक पक्षाला विचारतात की तुम्हाला सरकार स्थापन करायचं आहे का? सगळ्यांनी नकार दिला तरच मग त्यांना राष्ट्रपती राजवट लावता येते. पवारसाहेबांनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही नाही म्हटलं तर शिवसेना एकटी सरकार स्थापन करू शकणार नाही. आम्ही नाही म्हटलं तर काँग्रेस सरकार स्थापन करू शकणार नाही. तेव्हा मी महाराष्ट्राचं मत आहे की आपल्याला स्थिर सरकार हवं आहे. म्हणून मग आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मग आपण सरकार स्थापन करू, असं फडणवीसांनी सांगितलं.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

राज्यपालांनी जेव्हा राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्यासाठी पत्राद्वारे विचारलं. तेव्हा त्याचं उत्तर माझ्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर ड्राफ्ट झालं. मग ते पत्र अजित पवारांनी शरद पवारांकडे पाठवलं. त्यावेळी शरद पवार हे लीलावती रूग्णालयात संजय राऊतांना भेटायला गेले होते. मग पवारसाहेबांनी सांगितलं की दोन मुद्दे काढा आणि आणखी दोन मुद्दे त्यात अॅड करा. त्या हिशोबाने पुन्हा पत्र ड्राफ्ट झालं. त्यावर अजित पवारांनी सही केली आणि ते पत्र राज्यपालांकडे पाठवण्यात आलं. मग तीनही पक्षांनी सरकार स्थापन करण्यास नकार दिला. मग तिसऱ्या पक्षाने म्हटलं की आम्ही सरकार स्थापन करू तरी ते शक्य नव्हतं. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली, असं फडणवीस म्हणाले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार