कोथरूड मध्ये रंगली अनोखी भाऊबीज समस्त माता भगिणी प्रथम आमदारांच्या औक्षण समारंभात उत्साही सहभागी

0

पुणे — कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महिलांना जाणवणाऱ्या विविध समस्या सोडवण्यावर आपण प्राधान्य देणार असून, विशेषतः महिलांच्या सुरक्षेतेला महत्व देणार असून, महिलांना सुरक्षित वातावरण कसे राहील याकडे आपण लक्ष देणार असल्याचे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी सांगितले. श्री मोकाटे रविवारी भाऊबीजेनिमित्त महिलांशी विविध ठिकाणी संवाद साधला. रविवारी भाऊबीजेनिमित्त कर्वेनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, किस्कीद्धा नगर, सुतारदरा आदी ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काकड आरती सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांना ओवाळलं. आणि त्यांच्या समवेत भाऊबीज साजरी केली. यावेळी श्री मोकाटे यांनी भावुक होतं महिलांशी संवाद साधला. त्यांची आपुलकीने चौकशी केली.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

यानंतर बोलताना श्री मोकाटे म्हणाले की, गेल्या काही वर्षात महिलावरील अत्याचारांचे प्रकार वाढत चालले आहेत ते रोखण्याची गरज आहे त्यासाठी आपण खास प्रयत्न करणार आहे.

आपण केवळ कोथरूड मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण पुणे शहरात याविषयी जनजागृती करणार आहे त्यासाठी विविध ठिकाणी महिलांसाठी मोफत कायदेशीर सल्लागार संपर्क कार्यालय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे विविध महाविद्यालये व शाळेमध्ये रॅगिंग कमिटी आहे का याची चौकशी करणार आणि नसल्यास तिथे नेमण्यास लावणार तसेच रॅगिंग कमिटीची दरमहा मिटिंग होते किंवा नाही याची चौकशी करून पाठपुरावा करणार आहे. आपल्या दृष्टीने महिलांना सुरक्षित वातावरण करणे हिच खरी भाऊबीज ठरणार आहे

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन