कोथरूडमध्ये दादांच्या शिलेदाराची शक्तीप्रदर्शनात बाजी; बहुजनांचे हक्काचे शक्तीकेंद्र ‘ॲक्टिव्ह’; अचानक गणिते बदलली

0

कोथरूड विधानसभा मतदारसंघ लढत यंदा रंजक वळणावर आली असून हिंदुत्ववादी विचाराची भाजप शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे तीन दावेदार उमेदवार असतानाच पुरोगामी विचाराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शिलेदार (वंचितांचे हक्काचे शक्तीकेंद्र) अचानक सक्रिय झाले अन उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनात जनसमुदाय लोटला. शेकडो रिक्षा अन् हजारो महिला भगिनी, तरुणांचे जथ्थे असा जनसमुदाय एकवटला आणि पुणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी विजय डाकले यांनी सोमवारी सकाळी कोथरूड मतदार संघामध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये काल शेवटच्या दिवसापर्यंत 26 उमेदवारांनी अर्ज दाखल केले परंतु या सर्व घडामोडीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदाराचे विरोधात मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शक्ती प्रदर्शनाने संपूर्ण कोथरूडकर यांचा लक्ष वेधलं गेलं.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये सुमारे 1.50 लाख दलित बांधव अन 50 हजार पूरोगामी विचाराची मते असल्याने विजय डाकले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडे कोथरूड मतदारसंघाची जागा मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, परंतु ही जागा महायुतीत भाजपकडे असल्याने आणि चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कट्टरवादी विचारांमध्ये झालेली विभागणी लक्षात घेत मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘पुरोगामी’ विचाराच्या आणि दलित बांधवांच्या अधिकार आणि हक्कासाठी विजय डाकले यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरत आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. महायुतीमधील पक्षातील पदाधिकाऱ्याने ही भूमिका घेतल्याने कोथरूड मधील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापणार असून राजकीय गणीतेही बदलणार आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

विजय डाकले यांनी आज शास्त्रीनगर भागातून सकाळी रॅली काढून मोठे शक्ती प्रदर्शन केले. ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. गुजरात कॉलनी येथे क्रेनव्दारे मोठा पुष्पहार घालून विजय डाकले यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्वयंपूर्तीने मतदार नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. महिला वर्गही रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा सहभाग नसलेल्या या रॅलीत स्थानिक नागरिकांच्या असलेल्या गर्दीची आज कोथरूड मध्ये चर्चा होती. पक्षाच्या कार्यकर्त्यां व्यतिरिक्त वैयक्तिक जनसंपर्कातून रॅलीला झालेल्या गर्दीतून डाकले यांनी आपली ताकद विरोधकांना दाखवून दिली आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

डाकले यांनी कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कोथरूड परिसर ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजी आणि घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. विजय डाकले यांची बंडखोरीची उमेदवारी कोथरूडच्या राजकारणात उलथापालथ करणारी ठरू शकते. त्यामुळे पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसत आहे.