जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार?

0
8

 अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन काहीच दिवसांपूर्वी संपला. या सीझनमध्ये सर्वच स्पर्धकांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत बिग बॉसचा पाचवा सीझन चांगलाच गाजवला. या सीझनमध्ये चर्चेत राहिलेली स्पर्धक म्हणजे जान्हवी किल्लेकर.जान्हवीने बिग बॉसचा खेळ गाजवत टॉप ५ पर्यंत मजल मारली होती. सध्या जान्हवी चांगलीच चर्चेत आहे कारण, तिच्याबद्दल अशी बातमी पसरली की, ती बिग बॉसमध्ये वापरलेल्या कपड्यांचा लिलाव करणार. अखेर जान्हवीने याविषयी मौन सोडलंय.

जान्हवी कपड्यांच्या लिलावाबद्दल काय म्हणाली?

जान्हवीने सोशल मीडियावर खुलासा करुन सांगितलं की, “माझ्याबद्दलची एक अफवा वाचली. ती बातमी म्हणजे जान्हवी किल्लेकर करणार बिग बॉसच्या घरातील १०० ड्रेस आणि ४० नाईट ड्रेसचा मी लिलाव करणार आहे. काय संबंध आहे या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे मी घेतलेत १०० कपडे आणि ४० नाईट ड्रेस. मग काय झालं? मी हे कपडे पुढेही वापरेन. मी त्याचा लिलाव का करेन. माझी अशी विनंती आहे की, अशा कोणत्याही अफवा पसरवू नका.”

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?