युगेंद्र पवारांनी विधानसभेची उमेदवारी मिळताच अजितदादांविरोधात दंड थोपाटले,

0
2

राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. युगेंद्र पवार यांना बारामतीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 45 उमेदवारांचा समावेश आहे. सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघाकडे बारामती विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच शरद पवार गटाकडून उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांचं नाव चर्चेत होतं. अखेर बारामतीमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगणार आहे.  उमेदवारी मिळताच युगेंद्र पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.