…यादी जाहीर न करताच अजित पवारांच्या हस्ते थेट १७ उमेदवारांना एबी फॉर्म; महायुतीत फक्तं ‘एवढ्या’च जागा?

0
2

अजित पवार गटातील मंत्री आणि काही आमदारांना सोमवारी अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्यावर बोलवण्यात आले. तिथे स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते जवळपास १७ उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यात प्रामुख्याने पक्षाचे मंत्री आणि विद्यमान आमदारांचा समावेश आहे.

उरलेल्या उमेदवारांना मंगळवारी एबी फॉर्म दिले जाणार असून पक्षाची अधिकृत उमेदवार यादी बुधवारी जाहीर केली जाणार असल्याचे अजित पवार गटातील सूत्रांनी सांगितले. महायुतीमध्ये अजित पवार गटाला ५५ ते ६० जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार पक्षाने तयारी सुरू केली आहे.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

एबी फॉर्म मिळालेले उमेदवार आणि मतदारसंघ

अजित पवार -बारामती,

छगन भुजबळ -येवला,

दिलीप वळसे पाटील – आंबेगाव,

हसन मुश्रीफ – कागल,

धनंजय मुंडे – परळी,

नरहरी झिरवाळ – दिंडोरी,

अनिल पाटील -अमळनेर,

धर्मरावबाबा आत्राम -अहेरी,

अदिती तटकरे – श्रीवर्धन,

संजय बनसोडे -उदगीर,

दत्तात्रय भरणे – इंदापूर,

माणिकराव कोकाटे – सिन्नर,

हिरामण खोसकर -इगतपुरी,

दिलीप बनकर – निफाड,

सरोज अहिरे – देवळाली,

अण्णा बनसोडे -पिंपरी

भरत गावित – नवापूर

(दिवंगत केंद्रीयमंत्री माणिकराव गावित यांचे चिरंजीव)

विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाकडून आपल्याला एबी फॉर्म मिळाल्याचे गावित यांनी सांगितले.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती