नागपुरे दांपत्याच्या दूरदृष्टीत ‘विकासाचा पायलट प्रोजेक्ट’ उमगला; ‘क्लिष्ट’ परिसरही आरामदायी अन् सुखावह झाला

0

…..संधीच सोन करणं म्हणजे काय! याची चाहूल अन अनुभव जर खडकवासला मतदारसंघांमध्ये कुठे घ्यायचे असेल तर त्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे नागपुरे दाम्पत्यांने साचेबंध आखणी अन दुरोगामी विचारावर विकसित केलेला प्रभाग 34. सिंहगड रस्ता परिसर म्हटलं की पूर्वी धस्स व्हायचं! पण स्वयंसेवक संघाचे विचार आणि प्रभु श्रीरामाच्या विचारांची असलेली बांधिलकीच्या जोरावर परिपूर्ण विकासासाठी अहोरात्र कल्पक विचाराने नागपुरे दांपत्य झटले! अन् कायापालट काय म्हणतात याची जाणीव नागरिकांना झाली.

सन 2012 पासून पुणे महापालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर नागपुरे दांपत्याने दूरदृष्टी ठेवत एक ‘तप’ विकासयज्ञ केल्यामुळे सिंहगड रस्ता परिसराचा नव्याने झालेला विकास हा पुणे शहरासाठी ‘पायलट प्रोजेक्ट’ झाला असून फक्त विकासात्मक दृष्टी झाला असल्यास अत्यंत ‘क्लिष्ट’ परिसर आरामदायी अन् सुखावह कसा करायचा याची जाणीव संपूर्ण पुणे शहराला झाली. मंजुषाताई नागपुरे यांनी विकासाचे ड्रीम मॉडेल करताना मुलभूत सुविधांची पूर्ती ते विकासाचा ‘पायलट प्रोजेक्ट’ प्रत्यक्षात उतरवल्याने आत्ता संपूर्ण खडकवासल्यात सातशे बंद विकासाचे मॉडेल म्हणून या भागाची ओळख निर्माण झाली आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

प्रभागात सात उद्यानांची निर्मिती, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय, सावित्रीबाई फुले ट्रेनिंग हॉल, भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी कीडा संकुल,(आयुक्ताची विशेष मान्यता), स्व. श्रीरंग शंकर म्हाळस उद्यान, पिण्याच्या पाण्याच्या ११० दशलक्ष लिटर क्षमतेच्या टाक्या, छत्रपती शिवाजीमहाराज सांस्कृतिक भवन व कला मंदिर अशा मूलभूत आणि अत्यावश्यक सोयीसुविधा पुर्ण केल्या आहेत.

त्यानंतर या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विठ्ठलवाडी ते माणिकबाग उड्डाणपूल, सनसिटी ते कर्वेनगर उड्डाणपूल, विश्रांतीनगर ते पू. ल. देशपांडे उद्यान रस्ता, पु. ल. देशपांडे उद्यानालगत कॅनॉल रोड, पु. ल. देशपांडे उद्यान ते फन टाईम असा एकूण साडे चार किलोमीटर लांबीचा पर्यायी रस्ता, खाऊ गल्ली – गोयल गंगा रस्ता या प्रमुख रस्त्यांची निर्मिती करून वाहतूक कोंडीला शह देण्याचे काम केले. मा. श्री. शरदचंद्रजी पवार ई लर्निंग स्कूल, सूर्यनगरी जॉगिंग ट्रॅक, रॉक गार्डन आणि लिली पार्क,विठ्ठलवाडी मंदिर दीपमाळ स्तंभ, साहित्यिक कट्टा,भव्य शिवजयंती, सांस्कृतिक दिवाळी पहाट, अशी जिंकूया दहावी, सहाय्यक दूत, महिला सक्षमीकरण, शालेय साहित्याचे वाटप, शिक्षणाचे आनंदी अंगण, प्रथम अर्बन फुटपाथ, मूल्य संस्कार शिल्पाची निर्मिती करत प्रभागाला एक विकासात्मक दर्जा निर्माण करून दिला आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सुरक्षाकवच

कोविड काळात प्रभागातील कोणत्याही नागरिकाला भीतीदायक वातावरण वाटू नये म्हणून नागपूर रे दाम्पत्याने संपूर्ण कोरोना काळात अहोरात्र जीवाची पर्वा न करत सेवाकार्य केलं आहे. ८०००० नागरिकांचे स्क्रिनिंग, विशेष सॅनिटायझरची निर्मिती आणि वाटप, व्हिटॅमिनच्या गोळ्यांचे वाटप, सोसायट्यांमध्ये थेट भाजी विक्री, धान्य कीट वाटप, घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी, फेसशिल्ड आणि मास्क वाटप, प्रभागात सर्वत्र औषध फवारणी, ६ ठिकाणी सॅनिटायझर कक्ष, स्क्रिनिंग आणि मोफत औषधोपचार अशी कटिबद्ध जबाबदारी स्वीकारली आणि त्यामुळेच आज या दुरोगामी धोरणात्मक आणि विकासाची खास धरलेल्या दांपत्याला खडकवासला मतदारसंघांत उत्साही वातावरणामध्ये स्वीकारलं जात आहे. घरोघरी होणारे स्वागतअन् आपुलकीने होणारी चौकशी ही आगामी संधीचे संकेतच मिळत आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा