कोथरुड चांदणी चौक जैन मंदिरामध्ये दशलक्षण महापर्व चे उत्साहात आयोजन

0

कोथरुड : चांदणी चौक येथील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर मध्ये, दिगंबर जैन समाजाचे भाद्रपद दशलक्षण महापर्व बुधवार दिनांक ४/९/२०२४ रोजी षोडषकारण व्रत पासून सुरू होऊन, बुधवार दिनांक १८/९/२०२४ रोजी अनंत पौर्णिमेच्या दिवशी क्षमावाणी च्या कार्यक्रमाने दशलक्षण धर्मपर्वाची समाप्ती पालखी मिरवणुकीने झाली. यावेळी जैन मंदिर मध्ये भव्य मंडप उभारून त्याचप्रमाणे मंदिरावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

या दशलक्षण धर्मपर्व च्या पवित्र पर्वामध्ये विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दररोज जैन मंदिरामध्ये सकाळी महाभिषेक, महाशांतीधारा, दशलक्षण पर्व पूजन, सायंकाळी मंगल आरती व त्यानंतर संगानेर(राजस्थान) येथील अवनीश शास्त्री यांचे दररोज दशधर्मावर प्रवचन इत्यादी विविध धार्मिक कार्यक्रमांचे नित्यनियमाने बारा दिवस आयोजन करण्यात आले होते.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

या दशलक्षण धर्मपर्वात उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, अकिंचन आणि उत्तम ब्रह्मचर्य या दशलक्षणांची पूजा करण्यात आली. दिगंबर जैन समाजात या दशलक्षण धर्म पर्व ला अत्यंत महत्त्व असून धर्मपर्व काळात उपवास, स्वाध्याय, तप, त्याग आदी उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले. रविवार दिनांक १५/९/२४ रोजी जैन समाजातील विविध लहान मुलांचे तसेच पाठशाळेतील मुलांचे विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांचा त्या निमित्ताने गौरव करण्यात आला.

बुधवार दिनांक १८/९/२४ रोजी अनंत पौर्णिमेच्या दिवशी क्षमावानी निमित्ताने दशलक्षण समाप्ती भव्य पालखी मिरवणूक सोहळ्याने झाली. चांदीच्या पालखी मध्ये भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान केली होती. १० दिवस निरंकार उपवास केलेले दिनेश गणेशवाडे व प्रीती पाटील तर पंचमेरू चे ५ उपवास ज्योती शहा व वासंती देशमाने यांची जैन धर्म प्रभावानेसाठी बग्गी रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंगेश ब्रास बँड यांचे सुमधुर बँड वादनाने जैन युवक युवतींनी गरबा चे नृत्य करीत आनंद लुटला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

त्यानंतर दहा दिवस निरंकार उपवास केलेल्या व्रतींचा पारणेचा कार्यक्रम मंदिरच्या स्वाध्याय हॉल मध्ये संपन्न झाला. त्यानंतर विविध धार्मिक कार्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भगवान महावीर मंडळ व श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराचे विश्वस्त दिनेश गणेशवाडे, मोहन कुडचे, उदय लेंगडे, अजित शेट्टी, सुनील बिरनाळे, ज्योती बुरसे, शोभा पोकळे, प्रीतम मेहता, प्रकाश कुडचे, तात्यासाहेब खोत, अशोक मगदूम आदी विश्वस्त उपस्थित होते.