शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली;

0

 गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. ज्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ८ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ७.७ लाख कोटी रुपयांनी घसरून ४३६.१० लाख कोटी रुपयांवर आलं आहे.सेन्सेक्स १.२३ टक्क्यांच्या म्हणजेच ८१४ अंकांच्या घसरणीसह ७९,२५० अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी ५० हा १.२० टक्क्यांच्या घसरणीसह २४,१०७ वर व्यवहार करत होता.

सकाळत्या तुलनेत शेअर बाजारात दुपारी आणखी घसरण दिसून आली. कामकाजादरम्यान इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये सर्वाधिक १८.७६ टक्क्यांची घसरण होऊन तो १०३९.९० रुपयांवर आला. तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, एचएल, सीडीएसएलसारख्या कंपन्यांच्या शेअरमध्येही मोठी घसरण झाली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

दुसऱ्या तिमाहीचे निकाल

आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत अनेक ब्लू चिप आणि इतर कंपन्यांचे निकाल निराशाजनक होते. आजच्या व्यवहारात इंडसइंड बँकेचा शेअर १९ टक्क्यांपर्यंत घसरला होता, ज्याचा सेन्सेक्सच्या तोट्यात १३० अंकांचा वाटा होता, तर एनटीपीसी ४ टक्क्यांनी घसरला. निराशाजनक तिमाही निकालांमुळे ब्लू चिप शेअर्मध्ये घसरण दिसून आली.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

चीनमधील प्रोत्साहनात्मक उपाययोजनांनंतर परदेशी गुंतवणूकदारांनी या महिन्यात १९ दिवसांसाठी भारतीय शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (एफआयआय) विक्री २४ ऑक्टोबरपर्यंत ९८,०८५ कोटी रुपये होती.

हाय बॉण्ड यील्ड आणि मजबूत डॉलर

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मागील सत्रात चार बेसिक पॉईंट्सची घसरण झाल्यानंतर शुक्रवारी १० वर्षांचं ट्रेझरी यील्ड ४.१९१८ टक्क्यांवर आला. मात्र, तो ४ टक्क्यांच्या वर कायम आहे. तो बुधवारी तीन महिन्यांच्या उच्चांकी ४.२६ टक्क्यांवर पोहोचला होता. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर निर्देशांक बुधवारच्या तीन महिन्यांच्या उच्चांकी स्तर १०४.५७ वरून किंचित बदलून १०४.०६ वर पोहोचला. या आठवड्यात त्यात ०.५६ टक्के वाढ झाली.