महायुतीत मुस्लीम लांगूनचालन खपवून घेऊ नका, धारावी प्रकरणावरून किरीट सोमय्यांच्या कुणाला कानपिचक्या, कुणावर धरला निशाणा?

0

धारावी येथील धार्मिक स्थळाच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करताना अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप भाजप नेत किरीट सोमय्या यांनी केला. त्यांनी हा प्रकार व्होट जिहाद आणि मुस्लीम तुष्टीकरणाचा असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी आज मुलुंड येथे सकाळी पत्रकार परिषद घेतली. महायुतीत मुस्लीम लांगूनचालन खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी घटक पक्षाला दिला. अजित पवार गटाने मुस्लीम विरोधी वक्तव्याविरोधात भाजप वरिष्ठांकडे पाढा वाचल्याच्या पार्श्वभूमीवर सोमय्या यांच्या वक्तव्याला महत्व आले आहे.

देवेंद्र फडणीवस यांना पत्र

धारावीत अनाधिकृत मस्जिद तोडण्यात येतय त्यावर अधिकार्‍यांना मारहाण करणे हे महाराष्ट्रात चालणार नाही .. त्यामुळे आजच या संदर्भात मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मुस्लिमांचे लांगुलचालन करणे आणि दंगली घडण्याचे काम उद्धव ठाकरे सेना, राहूल गांधींची काँग्रेस करत आहेत.. त्यासाठीच मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल आहे. लोकसभा निवडणुकीपासून उद्धव ठाकरे, राहुल गांधी मुस्लिमांचेल आंघोळ चालन करत आहेत. केंद्र सरकारने विधायक आपल्यावरही अशांतता चालवण्याचे पर्यंत करतायत यावर मी पत्र लिहिल आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मुस्लिमांचे लांगुलचालन चालणार नाही

मुस्लिमांचे लांगुलचालन बीजेपीला चालणार नाही. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींना चेतावणी देतो धरावा आणि गणपति मिरवणुकीत दगडफेकीच काम कोणी केलं. हे दंगली घडवण्याचं कट कारस्थान उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनीच घडवला आहे, असा आरोप त्यांनी केला.

हा तर वोट जिहाद

लोकसभेत उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी वक्फ board ची जमीन गिळंकृत करणे, मस्जिद अनाधिकृत आहे..हे लेन जिहाद आहे…आता वातावरण बिघडवून मुस्लिमांचे मतदान 100 टक्के व्हाव यासाठी दंगली घडवून आणल्या जातात वर्षा गायकवाड, राहुल गांधी, उद्धव ठाकरे लेन जिहाद ला प्रोत्साहन देतात आणि दंगली घडवतात, असा आरोप त्यांनी केला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

मित्र पक्षाला पण नाव न घेता सुनावले

tउद्धव ठाकरे गट शरद पवार एनसीपी आणि काँग्रेस हे गेल्या निवडणुकीत फक्त मुस्लिम मतदानानेच जिंकले. महायुती मधल्या कोणत्याही पक्षाने असा लांगुलचालन प्रकार केला तरी ते चालणार नाही, असे त्यांनी माहयुतीमधील मित्र पक्षाचे नाव न घेता सुनावले. सध्या अजित पवार गट मुस्लीमविरोधातील वक्तव्याप्रकरणात आक्रमक झाला आहे.