शरद पवारांना मोठा दिलासा! आत्ता चिन्हांची चिंता संपली; विधानसभेपूर्वी निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय

0

लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांना पिपाणी चिन्हामुळे फटका बसला होता. मतदारांनी तुतारीऐवजी पिपाणी चिन्हासमोरील बटन दाबल्याने पिपाणीला नाहक मतं मिळाली होती. मात्र आता निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे विधानसभेला शरद पवार गटाचा फायदा होणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीडमध्ये पिपाणी ह्या चिन्हाला ५५ हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. तिकडे साताऱ्यात पिपाणी चिन्हाला ३७ हजार मतं मिळाली होती, या मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवाराचा ३२ हजार मतांनी पराभव झाला होता. तिकडे दिंडोरीमध्ये पिपाणीला १ लाख ३ हजार मतं मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचं जे नुकसान झालं, ते विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरु होते.पिपाणी हे चिन्ह तुतारीसारखेच दिसत असल्यामुळे शरद पवार गटाला फटका बसला होता. त्यामुले शरद पवार गटाने शंका व्यक्त केली होती. पिपाणी चिन्ह रद्द करण्यात यावे, अशी मागणी शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आलेली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवले आहे. आता कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पिपाणी चिन्ह दिले जाणार नाही. याचा फायदा पवारांना विधानसभा निवडणुकीत होईल.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते. त्यापैकी ८ उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीचे ३१ उमेदवार जिंकून आलेले आहेत. त्यामुळे विधानसभेत पुन्हा फटका बसू नये म्हणून महायुतीचे नेते कामाला लागले आहेत. तर शरद पवारांनीही विधानसभेची तयारी सरु केलीय.