परिस्थितीवर लक्ष ठेवून; CM शिंदेंचे ‘हे’ आवाहन; कोल्हापूरला त्वरित इंटरनेट बंद करण्याचे आदेश

0
1

सोशल मीडियावर अक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर कोल्हापुरात तणाव निर्माण झाला आहे. याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदी हाक दिली होती. त्यानंतर आज मोठ्या सख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. या पार्श्वभूमिवर सध्या शहरात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. राज्य सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार सरकार आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यातं काम देखील गृह विभागाचं आहे. मी संबंधीत अधिकाऱ्यांशी वयक्तिक संपर्कात आहेत. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कायदा हातात घेणाऱ्यांना पाठीशी घातलं जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

संबंधित अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे आणि परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे तशी सगळ्या नागरिकांच्या सहकार्याची देखील अपेक्षा आहे. कुठेही अनुचित प्रकार होणार नाही याची गृहविभाग घेत आहे आणि गृहमंत्री देखील दखील जातीने यावर लक्ष ठेवून आहेत असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या होत्या. यामुळे शहरात तणावाची परिस्थीत निर्माण झाली होती.

यावेळी जमावाकडून अनेक दुकानांची, मालगाड्यांची तोडफोड करण्यात आलीये. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला तरी परिस्थिती नियंत्रणात येत नाहीये. यामुळं काही ठिकाणी पोलिसांनी अश्रूधुर कांड्या फोडल्या.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

६ जणांना अटक

गृहविभागाकडून लवकरात लवकर कोल्हापुरात शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते. यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेत दोषी असणाऱ्या, ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याची माहिती देखील दिली आहे.तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल आणि कोल्हापुरातील परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देखील केसरकरांनी सांगितले.कोल्हापुरात इंटरनेट बंद करण्याचे मोबाईल कंपन्यांना आदेश; पोलीस अधिक्षकांची माहिती

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. बिंदू चौक, अंबाबाई मंदिर परिसर, महाद्वार रोड या परिसरात तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांना इंटरनेट बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांच्या ठिय्या आंदोलनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक, मटण मार्केट, भाऊसिंगजी रोड परिसरात तणाव निर्माण झाला. या परिसरात जमावाने वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.

या ठिकाणी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान, सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती व्हायरल होऊ नये, यासाठी इंटरनेट बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.