विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

0

महाराष्ट्र विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

यावेळी सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचे वीज बिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी सरकारने एक रूपयांत पीक वीमा योजना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मागेल त्या शेतकऱ्याला सौरपंप ही योजणा सुरू केली जाणार आहे. या अर्थसंकल्पात इथून पुढे राज्यात पीकांचे नुकसान झाल्यास ई-पंचनामा प्रणालीद्वारे त्याचे पंचनामे करण्यात येणार आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

याचबरोबर अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दुध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यासाठी अर्थमंत्र्यांनी दुध उत्पादकांना 5 रूपये अग्रज देण्यात येणार आहे.

राज्यातील ग्रामीण भागात पीक साठवणुकीसाठी सोयी सुविधा नसल्याने शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीवेळी मोठे नुकसान होते. यावर उपाय म्हणून ‘गाव तिथे गोदाम’ हा प्रकल्प उभारला जाणार आहे.