खासदार कंगना राणावत यांची अजब मागणी; दिल्लीतील मुख्यमंत्र्यांची ही राखीव जागाच आली धोक्यात

0
2

बॉलिवूड गाजवल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत हिने राजकीय क्षेत्रात एन्ट्री घेण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या तिकीटावर तिने हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. संसदेच्या पहिल्या अधिवेशनात सोमवारी (ता.24) अनेक नवनिर्वाचित खासदारांनी आपल्या खासदारकीची शपथ घेतली त्यात कंगनाचाही समावेश होता. शपथविधी सोहळ्यानंतर ती दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात मुक्काम करणार असल्याची चर्चा सुरु होती. पण मात्र आता कंगनाने अजब मागणी करुन खळबळ उडवून दिली आहे.

कंगना रनौतने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ती महाराष्ट्र सदनात पोहचली .यानंतर तिने दिल्लीतील तात्पुरत्या निवासासाठी महाराष्ट्र सदनातील रूमची चाचपणी केली. सरकारी निवासस्थान मिळेपर्यंत कंगना महाराष्ट्र सदनात राहणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. मात्र, त्यानंतर तेथील खोल्या छोट्या असल्याने ती आपला मुक्काम हलविणार असल्याची बोलले जाऊ लागली. पण आता तिने महाराष्ट्र सदनातील चक्क मुख्यमंत्र्‍यांचाच सूट मागितला आहे

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

अभिनेत्री कंगना रनौत ही नेहमी तिच्या रोखठोक आणि वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असते.तिचं मूळ गाव हिमाचलमधील मंडी असलं तरी ती वास्तव्य आणि कर्मभूमी मुंबईच राहिली आहे. त्यामुळे तिने महाराष्ट्रावरील प्रेमही वेळोवेळी बोलून दाखवलं आहे. याच कारणामुळे ती दिल्लीत तात्पुरत्या निवासासाठी महाराष्ट्र सदनात मुक्कामाला पसंती दिल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्र सदनमध्ये नेमकं काय घडलं..?

अभिनेत्री खासदार कंगना रनौतने महाराष्ट्र सदनकडे अजब मागणी केली आहे. तिने महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचाच सूट मागितला असल्याची माहिती समोर येत आहे.काही वेळापूर्वीच कंगनाने महाराष्ट्र सदनात येऊन रूमची पाहणी केली होती.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

इतर रूम छोट्या असल्याने थेट मुख्यमंत्री सूट मिळावा अशी मागणी केली आहे.सदनातूनच महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला कंगनाने फोन केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. पण या यावर आता मुख्यमंत्र्यांचा सूट दिला जाणार नाही असे महाराष्ट्र सदनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सदनात राहण्याचा निर्णय कंगना बदलण्याची शक्यता आहे.