भाजपच्या महिला आमदाराचे हे स्वप्नही पूर्ण; 17 वर्षांची मेहनत कामी आता ऑलिम्पिकही गाजवणार

0

पॅर्पोरस ऑलम्पिक 2024 मध्ये शॉटगन ट्रॅप स्पर्धेत बिहारमधील भाजपच्या आमदार श्रेयसी सिंह यांची निवड झाली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत निवड व्हावी यासाठी तिने 17 वर्ष मेहनत घेतली. त्यानंतर श्रेयासी यांचे ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

बिहारमधील जमुई या विधानसभा मतदारसंघाचे श्रेयसी या प्रतिनिधित्व करीत आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेत शॉटगन ट्रॅप महिला स्पर्धेत त्या खेळणार आहेत. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी लक्ष्य भेदणार आहेत. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑलम्पिकमध्ये खेळणाऱ्या पहिल्या बिहारी खेळाडू

अधिक वाचा  नेत्यांची प्रसारमाध्यमांत महायुतीची हाक आणि मेळाव्यात ‘एकला चलो’चा नारा भूमिका स्पष्ट नसल्याने इच्छुकांची मोठी अडचण?

अर्जुन पुरस्कार विजेत्या असलेल्या बिहारमधील भाजप आमदार श्रेयसी सिंह यांनी यापूर्वी कॉमनवेल्थ आणि आशियाई स्पर्धेत पदक पटकावले आहे. ऑलम्पिकमध्ये खेळणारी श्रेयसी या पहिल्या बिहारी खेळाडू आहेत. श्रेयासी यांनी 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना जमुई या मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता.

राजकारणात सुद्धा मारली बाजी

शूटर असलेल्या श्रेयसी सिंहचा बिहारमधील राजघराण्यात 29 ऑगस्ट 1991 मध्ये जन्म झाला. श्रेयसी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांची आई पुतुल सिंग याही खासदार राहिल्या आहेत. श्रेयसी यांना राजकारणाचा वारसा त्यांच्या घराण्यातूनच मिळाला. त्यामुळे त्यांनी राजकारणात सुद्धा बाजी मारली आहे.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

मतदारसंघात आनंदाचे वातावरण

आमदार असलेल्या श्रेयसीचे शिक्षण दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून झाले. त्यासोबतच फरिदाबादमधून एमबीएची पदवी त्यांनी घेतली. त्यांची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः त्या मतदारसंघाच्या आमदार असलेल्या जमुई या मतदारसंघात आनंदाचे वातावरण आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरीकडे लक्ष

श्रेयसी सिंह यांनी 2014 मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत डबल ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदकावर नाव कोरले होते. तर 2014 मध्येच शगुन चौधरी आणि वर्षा वर्मन यांच्यासोबत इंचॉन येथील 2014 आशियाई क्रीडा स्पर्धेत डबल ट्रॅप सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. विशेष म्हणजे श्रेयसी यांनी ऑस्ट्रेलिया राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत डबल ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  बळीराजाचा आयुष्य चिंतेच अन् दादा तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात लावणी…. महिलेचे ठुमके…. मस्त चाललय तुमचं!