शरद पवारांचा अचंबित उत्साह! विधानसभेची ‘पेरणी’ सुरू; 3 दिवसात तब्बल 11 शेतकरी जाहीर मेळावे घेणार

0

देशात लोकसभेची निवडणूक झाली निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं इंडिया आघाडीनेही चांगली कामगिरी केली परंतु या यशामध्ये भाळून न जाता शरदचंद्र पवार यांनी सर्वात अगोदर पहिलं काम काय केलं असेल तर ते दुष्काळी भागाचा पाहणी दौरा! आणि या दरम्यान त्यांनी मतदार राजांना शब्द दिला होता की तुम्ही बरोबर रहा मी राज्यातल्या सरकार बदलून देतो! …..आता सगळ्यांना वेध लागलेत ते विधानसभा निवडणुकीचे… राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीची तयार सुरु केली आहे. शरद पवार उद्यापासून पुन्हा बारामती दौऱ्यावर असणार आहेत. शरद पवार उद्यापासून 3 दिवस बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी शरद पवार स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी शरद पवार जाणून घेणार आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

शरद पवारांचा पुन्हा शेतकऱ्यांशी संवाद

लोकसभेनंतर शरद पवार विधानसभेच्या ‘पेरणी’ करत आहेत, असं म्हणयला हरकत नाही. कारण दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार तीन दिवस बारामतीत असणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यात शेतकरी मेळावे होणार आहेत. 3 दिवसात शरद पवार 11 शेतकरी मेळावे घेणार आहेत. शरद पवार पुन्हा शेतकऱ्याच्या बांधावर जाणार आहेत. याधी शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील दुष्काळी गावांचा दौरा केला होता. त्यानंतर उद्यापासून पवार पुन्हा दौऱ्यावर जाणार आहेत.

पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन काय?

शरद पवारांनी नुकतंच दुष्काळी दौरा केला. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडे विनंती करणार आहे. मात्र सध्याचं सरकार माझं किती ऐकेल हे माहिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्य हातात पाहिजे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला जसं आपण साथ दिली तसंच आगामी विधानसभा निवडणुकीतही साथ द्यावी, अशी साद पवारांनी शेतकऱ्यांना घातली. त्यानंतर आता शरद पवार शेतकरी मेळावे घेणार आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का देणारा निकाल समोर आला. तर इंडिया आघाडीला मात्र आशा दाखवणारी स्थिती आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 तर महायुती 17 जागांवर विजय मिळवता आला. तर सांगलीची जागा अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी जिंकली. त्यांनीही नंतर महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे असल्याचं चित्र आहे.