भाजपकडून अजितदादांच्या उमेदवाराचा पराभव, अवघ्या 56 मतांनी हार

0

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडताच अनेक एक्झिट पोल समोर आले, त्यामध्ये भाजपाच्या निर्भेळ यशाचा अंदाज वर्तवण्यात आला. आता भाजपला विजयाचा कौल मिळतो का ते उद्या, ४ जून रोजी स्पष्ट होईल. उद्या देशभरात मतमोजणी होणार असून अंतिम निकाल जाहीर होतील. मात्र त्यापूर्वीच भाजप समर्थकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपाने 46 जागा जिंकून सत्तास्थापनेची हॅटट्रिक केली आहे. मात्र तरीही राज्यात अशी एक सीट होती जिथे अत्यंत चुरशीची लढत झाली. अटीतटीच्या या लढतीत भाजपच्या उमेदवाराने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करून विजय संपादन केला. मिळालेल्या माहितीनुसार, नामसंग विधानसभा सीटवर मुख्य आदिवासी जमातींमध्ये नोक्टे आणि वांचो यांचा खूप प्रभाव आहे. हा मतदारसंघ अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या 60 मतदारसंघांपैकी एक आहे आणि ही जागा अनुसूचित जमाती (ST) वर्गात मोडते.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

भाजपने नामसांग जागा 56 मतांनी जिंकली

खरंतर अरुणाचल प्रदेशच्या नामसंग जागवर भाजपच्या वांगकी लोवांग आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगोंगलिन बोई यांच्यात लढत झाली. रविवारी सकाळी (2 जून) मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत झाल्याचे पहायला मिळाली. अखेर, भाजपच्या वांगकी लोवांग यांचा 56 मतांच्या फरकाने विजय झाला.

2019 मध्येही झाली होती अटीतटीच लढत

नामसांग विधानसभेच्य़ा जागेसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान झाले होते. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार वांगकी लोवांग यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव सकरत विजय संपादन केला. भाजप उमेदवाराने अटीतटीच्या या लढतीत 5,432 मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी कांग्रेस चे उमेदवार यल्लुम विरंग यांचा पराभव केला, त्यांना 4,109 मत मिळाली होती.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षांना मिळाल्या जागा ?

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 60 पैकी 46 जागांवर विजय मिळाला. NPEP ला 5, NCP ला 5, PPA ला 2, काँग्रेसला 1 आणि अन्य पक्षांना 3 जागांवर विजय मिळाला.