पुणे जिल्हाधिकारी मतमोजणीपूर्वीच बदला; खूप त्रास अन् दबाबही या मोठ्या अधिकाऱ्यांचे निवडणूक आयोगाला पत्र

0
2

पुणे : पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे राजकीय प्रभावाने काम करत असल्याने लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणी आधीच बदली करण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मुख्य व सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुहास दिवसे हे खेड-आळंदीच्या आमदारांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप पत्रातून केला आहे. या अगोदरच पुणे पोर्श कार प्रकरणी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे रडारवर अटक डॉक्टरची शिफारशीमुळे मंत्री हसन मुश्रीफही गोत्यात अन् आत्ता खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील त्यामुळे दादा गटातील आमदार-मंत्री या न त्या कारणाने चर्चेत असल्यामुळे अजित पवारांचीही डोकेदुखीही वाढण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

काय आहे प्रकरण?

“सुहास दिवसे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त, पीएमआरडीएचे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या राजकीय हितसंबंधांचा वापर केला आहे. दिवसे खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून काम करतात.‌ निवडणुकीच्या काळात दिवसे सतत त्यांना भेटत होते. त्या आमदाराचाही सुहास दिवसेंना प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासून पाठिंबा राहिला आहे” असा आरोप कट्यारे यांनी केल्याची माहिती आहे.

सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असल्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीआधी त्यांची बदली करावी, अशी मागणी कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. कट्यारेंनी पत्रात दिलीप मोहिते पाटलांचे थेट नाव घेत उल्लेख केलेला नसला, तरी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार या उल्लेखातून त्यांचा अंगुलीनिर्देश मोहिते पाटलांकडेच असल्याचे स्पष्ट होते.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ