मैत्री प्रतिष्ठान तर्फे वृद्धाश्रम, सेवाभावी संस्था अन् गोशाळेला मदत

0

कर्वेनगर मधील विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे , मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक विजय भाऊ खळदकर यांनी सामाजिक बांधलिकी जपत वाढदिवसाचे ओंचित्य साधून व होणारा खर्चिक अपय्यव टाळण्यासाठी कर्वेनगर कोथरूड भागातील मातोश्री वृद्धाश्रम आणि जीवन ज्योत संस्था मध्ये 1महिना पुरेल इतका किराणा व दैनंदिन गरजेचे साहित्य वाटप करण्यात आले आणि गोशाळा येथे अशा विविध ठिकाणी चारा भेट देण्यात आला.

विजय खळदकर यांनी वाढदिवसानिमित्त आवाहन करण्यात आले की ज्याच्या घरी ज्येष्ठ आई वडील एकटे राहत असतील त्यांना किराणा ‘जिथं गरज तिथील मदत कार्यास विजय सदैव तयार’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. ह्या स्तुत्य उपक्रम वेळी मैत्री प्रतिष्ठान चे संस्थापक विजय खळदकर , विराज खळदकर, प्रवीण मोकाटे, सचिन राजगोळकर, अजय राख सहभागी होते.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा