लोकसभा अखेरच्या टप्प्यात भाजप मंत्र्यांची तगडी फौज मुंबईत, केंद्रीय मंत्र्यांवरही भिस्त, मॅरेथॉन बैठकांचं नियोजन

0

मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील 6 मतदारसंघात मतदान प्रकिया होणार आहे. यासाठी 3 दिवस राहिले असताना सर्वंच राजकीय पक्षांनी प्रचारात जोर लावल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भाजपाची तगडी फौज मैदानात उतरणार आहे. 

मुंबईतील लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्र व राज्यातील मंत्री मैदानात उतरणार आहे. केंद्र व राज्यातील बडे मंत्री सभा व बैठकांच्या माध्यमातून करणार प्रचार आहेत. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, किरेन रिजिजू यांच्या आज सभा व बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार व उदय सामंत यांच्याही मुंबई व पालघरमध्ये जाहीर सभा होणार आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

कुठल्या नेत्याच्या कुठे सभा?

-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज सायंकाळी वडाळ्यात जाहीर सभा

-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पालघरच्या सातपाटी व दातिवरे येथे दोन सभांचे नियोजन

-केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची कांदिवलीत होणार जाहीर सभा

-उद्योगपती व व्यवसायिकांसोबत अश्विनी वैष्णव यांच्या मॅरेथॉन बैठका

-खार येथील सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तोफ धडाडणार

-केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे चर्चगेट येथे विशेष संपर्क अभियान

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिंडोरीसह कुर्ला व मुलुंड येथे घेणार सभा

-रामदास आठवले यांची चेंबूर येथे सभा-उदय सामंत यांची वडाळा येथे सभा

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

नरेंद्र मोदींची उद्या मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कमध्ये सभा-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या (17 मे) मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात जाहीर सभा होणार आहे. 20 मे रोजी मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांवर मतदान पार पडणार आहे. याआधी महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदशर्न सगळीकडे केले जात आहे. काल देखील नरेंद्र मोदींनी नाशिक आणि कल्याणमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. यानंतर मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो देखील पार पडला.

मुंबईतील लोकसभेच्या सहा जागा कोणत्या?

दक्षिण मुंबई- अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव

दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

उत्तर मुंबई- पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील

उत्तर मध्य मुंबई- उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड

उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील

वायव्य मुंबई- रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर