सैनिक समाज पक्षाचे उमेदवार कर्नल सुरेश पाटील यांचा घरोघरी प्रचार ; आजी-माजी सैनिक आणि सर्व स्तरातील समाज पाठीशी असल्याने विजय निश्चित.  

0

पुणे ता.२ मे,२०२४ : पुणे लोकसभेचे सैनिक समाज पक्षाचे उमेदवार कर्नल सुरेश पाटील यांच्या प्रचारार्थ पर्वती विधानसभा मतदासंघातील आंबेडकर वसाहत, मार्केट यार्ड आदी भागात केलेल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचार पदयात्रेस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घरोघरीं परिचय पत्रक वाटून त्यांच्या आजवरच्या कार्याविषयी माहिती दिली जात आहे. खडकवासला धरणातील गाळ काढल्याने मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढली आहे. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असतानाही पुणे शहरातील नागरिकांना आज खऱ्या अर्थाने पाणी मिळत आहे ते कर्नल सुरेश पाटील यांनी खडकवासला धरणातील गाळ उपसा चळवळीचे फलित आहे. पुणेकरांची तहान भागवणारा अवलिया अशी प्रतिमा आणि सर्वसामान्य नागरिक यांचा पाठिंबा यामुळे विजय निश्चित असल्याचे पुणेकर नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

यावेळी उमेदवार कर्नल सुरेश पाटील यांच्याशी बोलताना म्हणाले कि, “ही लढाई संघर्षाची आहे. सर्व पुणेकर नागरीक आणि आजी माजी सैनिकासह सर्व स्तरातील समाज घटक मागे ठामपणे उभा आहे. सैनिक समाज हा पक्ष संघर्षातून उभा राहिलेला पक्ष असून कायम संघर्ष करणाऱ्यांच्या मागे उभा आहे. सीमेवर लढणारा सैनिक आणि कष्टकरी समाज असलेल्या प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी उभा असलेला आमचा पक्ष आहे. त्यामुळेच पुणे शहरात प्रस्थापित पक्षाचे उमेदवार असले तरी मी संघर्षातून घडलेला कार्यकर्ता असून मला सामान्य जनतेच्या व्यथा जवळून माहित आहेत. पुणेकर नागरिक सुज्ञ आणि वैचारिक क्रांती करणाऱ्याच्या कायम पाठीशी असल्याने गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून मला नक्कीच प्रचंड मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन