बॉलिवूडमधील सगळ्यांचं लाडकं कपल म्हणजे अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल (Kajol). ही जोडी कायमच त्यांच्या प्रोजेक्ट्ससोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. आपल्या दोन्ही मुलांना काजोल आणि अजय देत असलेली साथ, त्यांच्यावर केलेले संस्कार याची सोशल मीडियावर कायमच चर्चा होत असते. सोशल मीडियावर सुद्धा अजय आणि काजोल त्यांच्या मुलांचे फोटोज शेअर करत असतात. नुकतीच काजोलने तिची मुलगी निसासाठी एक खास पोस्ट लिहिली. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.






काजोलची पोस्ट
काजोलनं पोस्टमध्ये लिहिलं,”उद्या निसाचा 21वा वाढदिवस आहे पण माझ्या मनात तिच्याबद्दल असलेल्या भावना मला व्यक्त करायच्या आहेत. मी आई कशी बनले याबद्दल आज मला व्यक्त व्हायचंय. तिने माझी सगळ्यात मोठी इच्छा कशी पूर्ण केली? आणि त्यानंतर माझा प्रत्येक दिवस फक्त ती असल्यामुळे कसा आनंदी गेला? हे सर्व मला सांगायचं आहे. ती खूप प्रेमळ आहे आणि ती मला प्रत्येक गोष्टीत साथ देते. माझ्या या बाळाबद्दल बढाया मारणे मला नेहमीच आवडते. एखाद्या प्रेमळ गोष्टीसाठी तुमच्या लाडक्या सैनिकाला बोलवून घेण्यासारख्या या सर्व गोष्टी आहेत. कधी कधी मला असं वाटत कि तिला पुन्हा गुंडाळून माझ्या पोटात एका दिवसासाठी ठेवून द्यावं. प्रेम हा खूप छोटा शब्द आहे तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल नेमकं काय वाटतं हे? सांगण्यासाठी. ते त्याही पेक्षा खूप जास्त आहे.Taking a bow now.”
अशी पोस्ट काजोलने शेअर केली असून अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. यासोबतच काजोलने निसा लहान असतानाच तिच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. उद्या म्हणजे २० एप्रिलला निसा एकवीस वर्षांची होणार आहे आणि त्यासाठीच काजोलने ही खास पोस्ट लेकीसाठी शेअर केलीये.
निसा सध्या सिंगापूरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करत असून ती इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी या विषयात पदवी घेत आहे. सोशल मीडियावर तिचे विमानतळावरील फोटोज किंवा पार्टीजमधील फोटोज कायम व्हायरल होत असतात.











