माजी मुस्लिम नगरसेवकाला पराभूत भाजपा उमेदवाराची रूग्णालयात लोखंडी पाइपने मारहाण; अद्याप अटक नाही

0

पुणे जिल्ह्यातल्या दौंड नगरपालिकेतील एका माजी नगरसेवकाला दुसऱ्या एका पराभूत उमेदवारांकडून रूग्णालयाता जाऊन लाथाबुक्के घालून मारहाण केली गेली. या मारहाणीत संबंधित माजी नगरसेवक हा गंभीर जखमी झाला आहे. प्रभागात सुरु असलेल्या ड्रेनेजच्या कामावर ‘लक्ष’ ठेवल्यामुळे वाद होऊन, मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आता दौंड येथील पोलिस स्थानकात एकूण सात जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दौंड शहर असणाऱ्या खाटीक गल्ली या ठिकाणी गटार योजनेतील काम सुरू आहे. 8 एप्रिल रोजी दौंड शहरात कार्यरत असणाऱ्या नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडीचा माजी नगरसेवक शहानवाज इब्राहीम खान-पठाण व त्यांचे सहकारी अरीफ लतीफ बागवान हे दोघेही त्या ठिकाणी आले होते. याचवेळी भारतीय जनता पक्षाचा (BJP) पराभूत झालेला उमेदवार अकबर सय्यद यांच्याशी वादविवाद झाला. तू येथे कशाला आला? असे विचारल्यामुळे यांच्यात हाणामारी झाली. अरिफ बागवान याच्यावर लोखंडी फावडा मारण्यात आल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

दरम्यान जखमी अरिफ बागवान याच्याकडून पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात येऊ नये. यात दाखल असलेल्या रुग्णालयात जाऊन दमदाटी करत होते. अकबर सय्यद त्याच्या सहकाऱ्यांनी लोखंडी पाइपने मारहाण करीत शहानवाज याला लाथाबुक्क्यांनी तुडविले. दुखापत करून शिवागीळ करण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दौंड पोलिसांनी शहानवाज खान याच्या फिर्यादीनुसार अकबर सय्यद, अजहर अकबर सय्यद, मोईनुद्दीन फरीद शेख उर्फ मोन्या, निसार खान, तलहा हबीब सय्यद, जुबेर अकबर सय्यद व अरबाज अकबर सय्यद (सर्व रा. खाटीक गल्ली, दौंड ) यांच्याविरूध्द बेकायदेशीर जमाव करणे, दंगा करणे, घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत पोचविणे, शांतताभंग करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे, प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता