महाराष्ट्रात लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे उमेदवार नॉमिनेशन फॉर्म भरण्याच्या लगबगीत आहेत. असे असताना एक सर्वे समोर आला आहे. या सर्वेनुसार महायुतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण महायुतीने 45 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे. पण महायुतीला अवघ्या 21-24 जागांवर समाधान मानावे लागणार असा अंदाज आहे. त्यामुळे महायुतीच्या 20 ते 17 जागा ‘डेंजर झोन’मध्ये आहेत. या जागांचा फायदा थेट महाविकास आघाडीला होण्याचीही शक्यता आहे.
लोक पोलने एक मेगा सर्वे केला आहे. या सर्वेत लोकसभेच्या 48 जागांवर कोणत्या आघाडीला किती जागा मिळतील? असा सर्वे करण्यात आला होता. यानुसार महायुतीला अवघ्या 21-24 जागा मिळण्याचा अंदाज सर्वेतून समोर आला आहे. खरं तर महायुतीचे 45 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे. मात्र त्यांना साध्या 25 जागाही जिंकता येत नसल्याचे चित्र सर्वेंतून स्पष्ट होत आहे. तसेच गेल्यावेळी युतीने 41 जागा जिंकल्या होत्या, पण यावेळी 21 ते 24 जागाच मिळण्याचा अंदाज आहे. असा निकाल आला तर महायुतीला तब्बल 20 ते 17 जागांचा फटका बसेल. महत्वाचं म्हणजे गेल्यावेळी भाजप आणि शिवसेना हे दोनच पक्ष होते. यावेळी भाजप शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसही महायुतीत आहे, तरीही हा फटका बसण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीतील दोन पक्ष फुटले आहेत. त्यामुळे मविआ कमकुवत होईल असे अंदाज होते, पण या पोलमध्ये मविआ वरचढ ठरताना दिसत आहे. महाविकास आघाडीला या सर्वेत 48 पैकी 23-26 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यात महायुतीच्या 20 ते 17 जागा डेंजर झोनमध्ये आहेत. या जागांवर महाविकास आघाडीला आघाडी घेण्याची संधी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाढण्याच्या शक्यता आहे.
भाजपच्या जागाही घटणार?
गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्यावेळेस भाजप-शिवसेना युतीतून लढली होती. त्यावेळेस या युतीला 41 जागा जिंकता आल्या होत्या. तर त्यापैकी 23 जागा भाजपने तर 18 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. पण यावेळेस भापज सोबत शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट असून देखील त्यांनी अवघ्या 14-17 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भापजने शिवसेना, राष्ट्रवादीला घेऊन सुद्धा त्यांच्या जागा घटताना दिसत आहे. तर काँग्रेसला गेल्यावेळी 1 जागा जिंकता आली होती. मात्र सर्वेनुसार त्यांना 9-12 जिंकता येणार आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी ही दिलासादायक बाब आहे.